मुंबई

मेट्रो मार्ग अंशतः भूमिगत 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  - वडाळा ते मुख्य टपाल कार्यालय (जीपीओ)पर्यंतचा मेट्रोचा मार्ग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परिसरात भूमिगत करावा, असा प्रस्ताव पोर्ट ट्रस्टने केंद्र सरकारला पाठवला आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यात करारही झाला आहे. केंद्राने परवानगी दिल्यास सुमारे चार किलोमीटरचा मार्ग भूमिगत होणार आहे; मात्र त्यासाठीचा खर्च तिपटीहून अधिक वाढणार आहे. 

वडाळा ते ठाणे कासारवडवलीपर्यंतचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी वडाळा ते जीपीओपर्यंत मेट्रोच्या 11 व्या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो मार्ग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेतून जात आहे. पोर्ट ट्रस्टने पूर्व सागरी किनाऱ्याचा विकास आराखडा तयार केला असून, त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र आणि सागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पोर्ट ट्रस्टची जागा वाचवण्यासाठी मार्ग अंशत: भूमिगत करण्याचा पर्याय प्रशासनाने पुढे केला आहे. 

जमिनीवर मेट्रो प्रकल्प उभारायचा झाल्यास प्रत्येक किलोमीटरसाठी 300 कोटी रुपये खर्च येतो. भूमिगत मेट्रोसाठी तो एक हजार कोटीपर्यंत जातो. दोन्ही प्राधिकरणांमधील करार केंद्र सरकारने मान्य केला तरच एमएमआरडीएचा तिसरा अंशतः भूमिगत मार्ग असेल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, त्यामुळे वाढणारा खर्च एमएमआरडीएला स्वतःच्या तिजोरीतून द्यावा लागेल. सद्यःस्थितीत या मार्गावरील रेल्वेस्थानक परिसर व निधी कसा उभा राहू शकतो यावर करारातील मुद्द्यांनुसार प्राथमिक चर्चा सुरू आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीखालचा मार्ग भूमिगत करण्यावर भर देण्यात आला आहे. जेणेकरून जमिनीवर अन्य विकासकामांचे आराखडे पोर्ट ट्रस्टला आखता येतील, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. 

पोर्ट ट्रस्टच्या मालकीचा चार कि.मी.चा मार्ग भूमिगत करण्याचा एमएमआरडीए आणि पोर्ट ट्रस्टचा विचार आहे. सध्या पोर्ट ट्रस्टच्या ज्या जमिनीवरून मार्ग भूमिगत करण्याचे निश्‍चित झाले आहे, त्या जमिनीचे परीक्षण केले जात आहे. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे संजय भाटिया यांनी सांगितले. 

हे मार्ग सध्या अंशतः भूमिगत 
मेट्रोचा 7 ए (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) आणि मेट्रो 8 (छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ) 

वडाळा ते सीएसएमटी मार्ग 
- 14 किलोमीटर लांबी 
- मुंबई पोर्ट ट्रस्टमधून चार किलोमीटरचा मार्ग 
- सीएसएमटीपासून ठाण्यापर्यंत प्रवासाचा नवा पर्याय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

VIDEO: बाप तसा लेक! गोविंदाच्या मुलाच्या जबरदस्त डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT