मुंबई

मुंबईत 'या' वयोगटाला आहे कोरोनाचा सर्वाधिक धोका...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्यांही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईनं कोरोनाबाधितांच्या संख्येत चीनच्या वुहान शहरालाही मागे टाकलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेला आहे. रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. मुंबईतील मृत्यूचा दर 3.3 टक्के असला तरी एकूण बाधितांचा आकडा वाढल्यामुळं दरदिवशी होणारे मृत्यूही वाढत आहेत. 

या मृतांमध्ये 50 ते 70 वयोगटातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 8 जूनपर्यंत मुंबईत 1700 कोरोनाबळींची नोंद झाली. त्यापैकी 999 मृत्यू 50 ते 70 वयोगटातील आहेत. गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत दर दिवशी 50 हून अधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होताहेत. नंतर 60 ते 70 वयोगटातील 495 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत 50 ते 70 वयोगटातील रुग्णांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं समजतंय.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण 

वय वर्षे     बाधितांची संख्या      मृतांची संख्या

  • 0 ते 10            885             2
  • 10 ते 20        1657             4
  • 20 ते 30        7718           24
  • 30 ते 40        9178           83
  • 40 ते 50        9266         274
  • 50 ते 60        9782         504
  • 60 ते 70        6508         495
  • 70 ते 80        2941         233
  • 80 ते 90          897           69
  • 90 ते 100        109            11

मागील 8 दिवसांपासून दर दिवशी 50 च्या वर रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांमध्येही 30 ते 60 वयोगटातील रुग्णांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारा हा वयोगट आहे. कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचं प्रमाण 50 टक्के असून, महिलांचं प्रमाण 40 टक्के आहे. एकूण मृतांमध्ये 50 ते 70 वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. 

मुंबईत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्यापुढे गेली आहे. त्यापैकी 22,942 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर 26,178 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

this particular age age group has maximum threat of getting corona in mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT