मुंबई

महाविकास आघाडीला झटका, BMC निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई काँग्रेस अध्यक्षांची महत्त्वपूर्ण माहिती

दीनानाथ परब

मुंबई: आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक (bmc election) काँग्रेस महाविकास आघाडी (mva govt) सोबत लढवणार नाही. काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढेल असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी स्पष्ट केले. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून स्वबळाची भाषा सुरु आहे. त्याचे पडसादही महाविकास आघाडीमध्ये उमटताना दिसत आहेत. आता भाई जगताप (bhai jagtap) यांनी, पुढच्यावर्षी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिलं आहे. (party will go solo in BMC elections Mumbai Congress chief bhai jagtap )

"मी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वच्या सर्व २२७ जागा लढवेल असे सांगत आहे. हे असं पहिल्यांदा घडत नाहीय. १९९९ ते २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि आरपीआयसोबत आम्ही सत्तेमध्ये होतो. पण मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली" असे भाई जगताप म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच बोलताना 'चप्पला'चा उल्लेख केला होता. त्यावर "मुख्यमंत्र्यांनी हे विधान त्यांच्या पक्षाला प्रोत्साहित करण्यासाठी केले असेल. आगामी मुंबई महापालिकेचा विचार केला, तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल" असे जगताप यांनी सांगितले.

"लोकांच्या अडचणींवर उपाय शोधल्याशिवाय जे लोक स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबद्दल बोलतायत, त्यांना लोक जोड्याने मारतील" असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. शनिवारी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी कोणाचेही नाव न घेता सहकारी पक्षांवर टीका केली होती. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा १४ जूनलाच काँग्रेस आगामी विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीसोबत न लढता स्वबळावर लढेल असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून स्वबळाच्या विधानावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT