मुंबई

ओमानच्या रुग्णाला गरज होती उपचाराची; एअर एम्बुलन्सने दाखल केले मुंबईच्या रुग्णालयात....

संजय घारपुरे

मुंबई : कोरोना महामारीमुळे मुंबईसह देशातील अनेक रुग्णालये भरली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे आपण पाहिले. मुंबईत कोरोनाचे संकटही तीव्र असताना एका परदेशी रुग्णाला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असताना खास चार्टर एअर अॅम्बुलन्सने त्याला मुंबईत आणण्यात आले. 

ओमान येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय युवकावर जर्मनीत एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना एन्युरिजम रक्तस्रावाचा त्रास सुरु झाला, त्यामुळे त्यांना दीर्घकालीन पुनर्वसन  (extensive rehabilitation) प्रक्रियेस सामोरे जाणे भाग पडणार आहे. त्यासाठी ते मार्च महिन्यात मुंबईत येणार होते, पण कोरोना महामारीमुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मात्र परवानगी मिळाल्यानंतर ते खास चार्टर अॅम्ब्युलन्स विमानाने मुंबईत आले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी मस्कत येथील भारतीय दूतावासात यासाठी अर्ज केला होता. 

रुग्ण तसेच त्यांच्यासह असलेल्या व्यक्तींची ओमानमधून निघण्यापूर्वी कोरोना चाचणी झाली होती. दोघेही त्यात निगेटीव्ह आले होते. मुंबईत आल्यावर करण्यात आलेली चाचणीही निगेटीव्ह आहे. सदर रुग्णास कोकीळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ. अभिषेक श्रीवास्तव आणि डॉ. नवीता पुरोहित उपचार करीत आहेत..
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: तर हा आहे अमेरिकेचा मास्टर प्लॅन, भारतावर का लावला टॅरिफ? पत्रकार परिषदेत सांगतिलं कारण

Pune Rain Update : पावसाचा जोर पुण्यात ओसरला; कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ

Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक

Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात

SCROLL FOR NEXT