मुंबई

टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात आळ्या; महापालिकेने घेतली तत्काळ दखल

सुचिता करमारकर

कल्याण  :  कल्याण डोंबिवली पालिकेच्या टाटा आमंत्रा येथील क्वारंटाइन सेंटरवरील जेवणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  सेंटरमध्ये दाखल एका रुग्णाने पुराव्यासह शंका उपस्थित केली आहे.  येथील जेवणात अळ्या असल्याचा व्हिडिओ या रुग्णाने समाज माध्यमांवर अपलोड केला आहे. डोंबिवली येथील एका रुग्णाने जेवणात आलेल्या भाजीत अळ्या असल्याची तक्रार केली आहे. यावर पालिका प्रशासनाने कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. 

19 सप्टेंबरला हा रुग्ण येथे दाखल झाला आहे. 23 सप्टेंबरला रात्री जे जेवण देण्यात आले होते त्यातील भाजीत अळ्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांना माहिती दिली. मात्र या रुग्णाने पालिका प्रशासनाशी याबाबत कोणतीही संपर्क केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वीही येथील जेवणाचा दर्जा तसेच इतर सुविधांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत.

पालिका प्रशासनाने असा प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रुग्णांच्या आहारात सोयाबीनचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्याच भाजीमध्ये हा प्रकार आढळून आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले यासंदर्भात संबंधित व्यवस्थापनास नोटीस देण्यात आली आहे त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. 

सोयाबीन चंक्स ज्या ठिकाणाहून खरेदी करण्यात आले होते, त्याचे बिल जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून मागविण्यात आले आहे. त्यानुसार त्या पुरवठादारावर अन्नभेसळ कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

संजय जाधव,
सचिव, कडोमपा

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT