मुंबई

ऐन लॉकडाउनमध्येही पाळणा हालणार; पण कुठे? वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लॉकडाउनमुळे संपुर्ण देश घरात अडकून पडल्याचा फायदा परदेशी पाहूण्यांना होणार सुट्ट्यांच्या महिन्यांत या परदेशी पाहूण्यांना एकांत मिळणे अवघड असतो.पण, यंदा विणीच्या हंगामात या पाहूण्यांना एकांत मिळून मुंबईत पुन्हा एकदा पाळणा हलण्याची शक्यता आहे.

भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील पेंग्विन ना बघण्यासाठी मे महिन्यांत प्रचंड गर्दी होते .तर, मे ते जुलै ऑगस्ट हा पेंग्विन पक्षाचा विणीचा हंगाम असतो.मात्र,सुट्टीची महिन्यात होणार्या गर्दी मुळे पक्षांना एकांत मिळत नाही.मात्र,यंदा मुंबईत मे महिन्याच्या अखेर पर्यंत ताळेबंदी उठण्याची शक्यता कमीच आहे.किमान 18 ते 19 मे पर्यंत ताळेबंदी न उठण्याचे संकेत राज्य सरकार कडून मिळत आहेत.त्यामुळे हा मे महिना पेंग्विनसाठी  शांततेचा होणार आहे.

दोन वर्षांपुर्वी फ्लिपर आणि मॉल्ट यांची जोडी जुळली होती.फ्लिपर या मादीने एक अंडही दिले होते.त्यातून पिल्लूही जन्माला आले होते.मात्र,जन्मजात दोषामुळे या पिल्लाचा अल्पवधित मृत्यू झाला होता.तर 2016 साली पेंग्विन भारतात आल्यानंतर काही महिन्यातच एका मादिचा मृत्यू झाला होता.सध्या राणीच्या बागेत तीन नर चार माद्या पेंग्विन आहेत.

पेंग्विनसाठी फ्रिज मधली मासळी 
पेंग्विनला फ्रोझन मासळी खायला दिली जाते.त्यातही उणे 80 तापमानाला ब्लास्ट पध्दतीने मासळी निर्जंतुकीकरण करु ती उणे 40 अंशाला साठवली जाते.फ्रोजन मासळी पेंग्विनला दिली जात असल्याने त्यांच्या अन्नाची कमतरता नाही असे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT