मुंबई

भीषण ! ना मास्क, ना ग्लोव्ज; इथं नागरिकांना लॉकडाऊन संपलाय असं वाटतंय बहुदा

सकाळवृत्तसेवा

मुंबई -  कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु बोरिवली पश्चिमेकडील अनधिकृत फेरीवाल्यांनी मात्र नेहमीप्रमाणे विना फेरीवाला क्षेत्रातील  पदपथावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे याठिकाणी लगतच बोरिवली पोलिस स्टेशन तर मागच्या रस्त्यावर आर/मध्य विभाग पालिका कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांमुळे  परिसरात वाहतूक कोंडी होत असते. लॉकडाऊनच्या काळातही सकाळी याठिकाणी भाजी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यात बोरिवली दहिसर परिसरातील अनेकजण सकाळच्या वेळेस भाजी घेण्यासाठी येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले फेरीवाले भाजी विकताना मास्क, ग्लोव्ज न लावता बिनधास्त वावरत असल्याचे दिसून आलं. त्यामुळे या फेरीवाल्यांकडून लाॅकडाऊनची ऐशी की तैशी झाल्याचे चित्र सध्या या परिसरांत दिसून येत आहे. यांची पालिका आर/मध्य विभाग आणि बोरिवली पोलिसांनी वेळीच खबरदारी घ्यावी, अन्यथा कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगांची लागण होण्याचा शक्यता नाकारता येवू शकत नाही. 

दरम्यान पालिकेने गर्दी टाळण्यासाठी दहिसर ते मालाड पर्यंत भाजीविक्रेताना दहिसर जकात नाका येथे जागा उपलब्ध करून दिली आहे तरीही याठिकाणी हा सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसून येते. पालिकेचे काही अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार करीत यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे.

बोरिवली पश्चिमेकडील न्यायालयालगत असलेल्या रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांनी हा सर्व खेळ मांडला आहे. पालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी राजमहाल हॉटेल जवळ उभी असतांनासुध्दा त्यांच्याकडून या भाजी विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. यामुळे याठिकाणी लाॅक डाऊन असूनही मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेत्यांची गर्दी होत आहे.

people in borivali roming like lockdown period is over and corona has gone

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT