gas 
मुंबई

कोरोनाची भीती ! गॅस सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यांना लोकांकडून मिळतीये अशी वागणूक, वाचा

सकाळवृत्तसेवा

मिरा रोड : लॉकडाऊनमध्ये लोकांच्या स्वयंपाकाची गैरसोय होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदरमधील डिलिव्हरी बॉय कोरोनाचा संभाव्य धोका पत्करुन आपल्या आरोग्याची काळजी न करता लोकांच्या दारात गॅस सिलेंडर पोहचवीत आहेत. मात्र ते अनेकांच्या संपर्कात येत असल्याच्या कारणावरुन काही ग्राहकाकडून त्यांना तुच्छ वागणूक दिली जात आहे. 

मिरा भाईंदर शहरात एकुण 9 एलपीजी सिलेंडर वितरक असुन प्रत्येक वितरकाकडे सुमारे 40 ते 45 डिलिव्हरी बॉय काम करतात. सद्या कोरोनाच्या भितीमुळे निम्म्याहून अधिक डिलिव्हरी कामगारांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. तर उर्वरीत डिलिव्हरी बॉय मास्क लावून अद्यापही शहरात सिलेंडर पोहोचविण्याचे काम करीत आहेत. 
सिलेंडर पोहोविण्याचे काम करताना ते अनेकांच्या संपर्कात येतात. मात्र त्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालय तसेच राज्य शासनाने इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याप्रमाणे कोणत्याही विम्याचे सुरक्षा कवच पुरविलेले नाही. एकीकडे केंद्र शासनाने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यांना आरोग्य विम्याच्या कक्षेत आणले असले तरी डिलिव्हरी बॉयला मात्र यापासून वंचित ठेवण्यात आल्याचे वितरकांकडून सांगण्यात येत आहे. अशातच त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ग्राहक तुच्छ वागणूक देत असल्याचे बाब समोर आली आहे. 

एरव्ही इमारतीचे अनेक मजले चढून आल्यानंतर त्यांना पाणी प्यायला दिले जात होते. आता त्याला पाणी तर सोडाच दाराबाहेर काही अंतरावरच सिलेंडर ठेवण्यास सांगितले जाते. त्याचे पैसे देखील एका पिशवीत अथवा जमीनीवर ठेवून त्यांना घ्यायला लावून तुच्छ वागणूक दिली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोनाच्या संसर्गातही आपला जीव धोक्यात घालून घरोघरी सिलेंडरची डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांना  अशा प्रकारची तुच्छ वागणूक न देता सिलेंडरची आवश्यकता असणाऱ्यांनी थेट गॅस गोदामातुन स्वतः सिलेंडर घेऊन जावे. केंद्र अथवा राज्य शासनाने इतरांप्रमाणेच यांनाही आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच द्यायला हवे . 
- हेमंत शाह, एचपी गॅस वितरक.

People despise people who deliver gas cylinders generously

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT