मुंबई

मुहूर्ताच्या खरेदीचा सुवर्णयोग! 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सोन्यातील तेजीने ग्राहकांचे डोळे दिपले असले तरी यंदा विक्री वाढेल, असा विश्‍वास सराफांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या धनत्रयोदशीनिमित्त दागिने, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बॉंडचा पर्याय ग्राहकांना निवडता येणार आहे. मुंबईतील झवेरी बाजार, दादर, परळ, लालबाग येथील प्रमुख सराफांनी सोने खरेदीवर सवलती जाहीर केल्या आहेत.

मुंबईत सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅमला 31 हजार 700 रुपयांच्या आसपास आहे. दिल्लीत सोने दर 32 हजार 780 रुपयांवर गेला आहे. जागतिक बाजारातील तेजीचे पडसाद भारतीय बाजारावर उमटले आहेत. सोन्यातील तेजीने बाजारात सकारात्मक वातावरण आहे. दसऱ्यापासून ग्राहकांची वर्दळ वाढली असून यंदा विक्री वाढेल, असे चिंतामणी ज्वेलर्सचे नितीन कदम यांनी सांगितले. 

गोल्ड "ईटीएफ'चे खास सौदे 
गोल्ड ईटीएफमधील मुहूर्ताच्या सौद्यांसाठी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात जादा वेळ ठेवण्यात आली आहे. संध्याकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत गुंतवणूकदारांना गोल्ड ईटीएफ खरेदी करता येतील, असे शेअर बाजाराने जाहीर केले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना गोल्ड बॉंडची खरेदी करता येणार आहे. 

सवलतीत सुवर्ण रोखे 
केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची (गोल्ड बॉंड) घोषणा केली आहे. 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान गोल्ड बॉंडची खरेदी करता येणार आहे. या योजनेत एक ग्रॅम गोल्ड बॉंडसाठी 3 हजार 183 रुपये निश्‍चित करण्यात आले आहेत. गोल्ड बॉंडची ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 50 रुपये प्रती ग्रॅम सवलत दिली जाईल. टपाल कार्यालये, बॅंका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन आदी ठिकाणी गोल्ड बॉंड उपलब्ध आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT