panvel municipal corporation
panvel municipal corporation google
मुंबई

पनवेलमध्ये आणखी तीन नवीन आरोग्य केंद्र

दीपक घरत

पनवेल : नागरिकांच्या आरोग्याची काळजी (people health care) घेण्याच्या दृष्टीने पनवेल क्षेत्रात आणखी तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary health center) उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या (panvel municipal) वतीने घेण्यात आला आहे. आयुक्त गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांनी केलेल्या सूचनेनुसार, खारघर, नवीन पनवेल आणि काळुंद्रे या ठिकाणी हे आरोग्य केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय जगताप (sanjay Jagtap) यांनी दिली.

पनवेल पालिका क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्त देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचे काम सुरू आहे. पनवेलचा झपाट्याने विकास होत असून शहरांची लोकसंख्याही वाढत आहे. त्‍यातुलनेत प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या कमी पडत असल्याने नागरिकांना नाईलाजाने खासगी आरोग्य यंत्रणांवर अवलंबून राहावे लागते. प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढवण्यात आल्यास नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याने भविष्यात लोकसंख्येच्या मानाने आरोग्य केंद्राची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नात, पनवेल शहर महापालिका तीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे विकसित करण्याची योजना आखत आहे. ही केंद्रे खारघर, नवीन पनवेल आणि काळुंद्रे (मुंबई-गोवा महामार्गालगत पनवेल शहराजवळ) विकसित केली जातील. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) त्यासाठी जमीन देण्याचे मान्य केले आहे.

या प्रत्येक केंद्रात ओपीडी आणि इतर प्राथमिक वैद्यकीय सुविधा असतील. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मांडण्यात येणार असून, मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांवर काम करताना केंद्र सरकारकडून निधी मिळविण्याच्या शक्यतांचा शोध घेतला जाणार आहे. नंतरच्या टप्प्यात शहराच्या इतर काही भागात तीन ते पाच इतर आरोग्‍य केंद्र विकसित करण्याची प्रशासनाचा विचाराधीन असल्‍याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढणार

पनवेल पालिकेमार्फत याआधी पनवेल गावदेवी पाडा,कोळीवाडा, नवीन पनवेल बांठीया हायस्कूल जवळ, कळंबोली, खारघर व कामोठे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चालवण्यात येत होते. या मध्ये काळुंद्रे, नवीन पनवेल आणि खारघरमधील आरोग्य केंद्राची भर पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT