Vaccination Sakal
मुंबई

कोविन अॅपचा गोंधळ; अपॉइंटमेंट घेऊनही मिळाली नाही लस

लस न घेताच नागरिक परतले

मिलींद तांबे

मुंबई : शहरातील लसीकरण केंद्रावर सोमवारपासून लसीकरणाला (corona vaccine) सुरुवात झाली. अनेक नागरिकांनी कोविन अँपवर नोंदणी (registration) करून आपल्या लसीकरणाची अपॉइंटमेंट मिळवली. गर्दी तमा न बाळगता रखरखत्या उन्हात नागरिक उभे राहिले. मात्र अनेक लसीकरण केंद्रातील लस संपल्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला. तर अनेक केंद्र बंद होती. कोविन अँपचा आणि पालिका यांच्यामध्ये समन्वय नसल्याने या अडचणी येत असल्याचे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (people not get the corona vaccine even after registration)

मंगळवारी सकाळी नोंदणी (registration) केलेल्या 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि 18 ते 44 वर्षाच्या नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली. मात्र काही वेळातच लस संपल्याचे कारण देत या नागरिकांना घरी जाण्यास सांगितले जाऊ लागले. आम्ही कोविन अँपमध्ये नोंदणी करून मिळालेल्या अपॉईटमेंटनुसार आलेलो असल्याने अनेक कोविड केंद्रावर घरी जाण्यास सांगणाऱ्या डॉक्टर आणि नागरिकांमध्ये वाद झाले.

वयस्कर आजीला लस घेण्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी केली. मला अपॉइंटमेंट मिळाल्याने आजीला सायनहून बीकेसी लसीकरण केंद्रात घेऊन आलो. मात्र नोंदणी करूनही बीकेसी लसीकरण केंद्रात आम्हाला लस न मिळाल्याने आजीला परत घरी नेण्याची वेळ आली. आजीचे वय अधिक असल्याने किती वेळा लसीकरण केंद्रात खेट्या घालायला लावणार. केंद्र सरकार आणि पालिकेत ताळमेळ नसल्याने ही वेळ येते असल्याचं सुरज पाटील या तरुणाने सांगितलं.

माझे वडील अनंत आडिवरेकर यांना लस द्यायची होती. लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अनेकांनी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करून आलेले नागरिक होते. दिलेल्या वेळेवर लस मिळेल याची खात्री असल्याने सर्व नागरिक लसीकरण रांगेत उभे होते. मात्र दुपारच्या सुमारास लस संपली आणि सर्व नागरिकांना घरी जाण्यास सांगण्यात आले.त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल सुरू असून योग्य सुविधा पुरविण्याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अक्षय अडिवरेकर या युवकाने व्यक्त केले.

"दमट वातावरण, वाट पाहणे आणि लसीचा तुटवडा या बाबीमुळे लसीकरण केंद्रावर अनेक नागरिकांची चीडचीड होते. त्यामुळे अनेक जण कर्मचाऱ्यांवर ओरडतात. मात्र कधी सर्वर, अँपचे प्रश्न आणि तांत्रिक बाबीमुळे लसीकरणात अडचणी येतात. या अडचणी आमच्या हाताबाहेरच्या आहेत. आम्ही जनतेचे सेवक आहोत,कृपया शासकीय सेवकांचा योग्य तो आदर राखायला हवा", असं सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

SCROLL FOR NEXT