विक्रोळी परिसरात घरांना लावलेले लाॅक. 
मुंबई

पालिकेची बस पाहताच घराला लाॅक लावून नागरिकांनी ठोकली धूम, वाचा नेमके काय घडले

सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर (बातमीदार) : कोरोनाबाधितांची संख्या सध्या मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचे प्रमाणही वाढले आहे. क्वारंटाईनसाठी घेऊन जाण्यासाठी आलेले पालिकेचे कर्मचारी व क्वारंटाईन बसला पाहून नागरिक आता घाबरून पळताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार विक्रोळीतील टागोरनगर परिसरातही घडला आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 100 च्या वर गेली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता 24 तासात 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण कन्नमवार नगर व टागोरनगरमध्ये आढळून आले आहे. त्यापैकी टागोरनगर ग्रुप नंबर 1 व अशोक नगर परिसरातील कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी क्वारंटाईन करण्यासाठी आलेले पालिकेचे कर्मचारी व क्वारटाईन बस पाहून आपल्या घराला टाळे लावून पळ काढल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग हा कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात कोरोना बाधितांची संख्या ही आजून मोठ्या प्रमात वाढू शकते असे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasha Mukt Yuva For Viksit Bharat : ड्रग्सविरोधात देशव्यापी अभियान; पंतप्रधानांचे तरुणांना आवाहन, म्हणाले- व्यसन स्वप्न उद्ध्वस्त करते

Dombivli: डोंबिवलीकरांसाठी जलवाहतुकीचा नवा पर्याय, रो-रो सेवा सुरू करणार, कधीपासून? महत्त्वाची माहिती समोर

Abhijit Dipkeच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह? RTI कार्यकर्त्याची तक्रार, दीपकेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन स्थलांतरित मजुरांच्या हत्यांना जबाबदार कोण? फारुख अब्दुल्लांचा सवाल

Sakal Foundation Day: शेती-उद्योगांच्या संतुलनातून शाश्वत विकास शक्य : प्रा. एस. महेंद्र देव; ‘सकाळ’चा ४६ वा वर्धापन दिन दिमाखात

SCROLL FOR NEXT