Mumbai High Court where the petition against CM Eknath Shinde and MLA Nitesh Rane was filed. esakal
मुंबई

Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी! उच्च न्यायालयात याचिका, काय आहे प्रकरण?

Petition in Mumbai High Court Seeks Action Against CM Shinde and MLA Rane for Alleged Anti-Muslim Remarks: या याचिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने या याचिकेला मान्यता दिली, तर मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. यामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Sandip Kapde

मुंबई: वांद्रे येथील रहिवासी मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार राणे यांच्यावर मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचिकेद्वारे मुख्यमंत्र्यांनी भडकाऊ भाषणांचे समर्थन केल्याचा दावा केला जात आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याचिकेतील आरोप आणि मागण्या-

या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार नितेश राणे यांच्यासह रामगिरी महाराज, हिंदू जनजागृती समिती, गुगल, ट्विटर, पोलीस महासंचालक आणि अन्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांचे वकील एड. एजाज नख्वी यांच्या मार्फत करण्यात आलेल्या या याचिकेत भडकाऊ वक्तव्ये आणि मुस्लिम विरोधी भाषणांबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याचिकेतील मुख्य आरोपांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार राणे यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्यांची पाठराखण केली आहे आणि यामुळे मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या भडकाऊ भाषणांमुळे धार्मिक तेढ वाढत असल्याचेही याचिकेत सांगितले आहे.

सुनावणीची शक्यता-

या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेत आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे मुस्लिम विरोधी भाषणांचे प्रसारण सोशल मीडियावरून तातडीने काढून टाकावे, तसेच न्यायालयाने मुस्लिमांना टार्गेट करणाऱ्या मोर्चे आणि आंदोलने यांचे लाइव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश द्यावेत.

याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, अशा प्रकारच्या भडकाऊ वक्तव्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि मुस्लिमविरोधी संदेश पसरवण्यापासून थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT