मुंबई

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; मुंबईत पेट्रोलने गाठली नव्वदी, तर डिझेलही अब कि बार 80 च्या पार

प्रशांत कांबळे

मुंबई, ता. 7 : देशभरात  पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (ता.7) रोजी देशातील चार मेट्रो शहरांची तुलना केल्यास मुंबईत  पेट्रोल, डिझेलचे दर अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आता पेट्रोल  90 रुपये लिटरच्या वर गेले आहे. तर डिझेलचे दर 80 रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. 

चेन्नई, दिल्ली, कोलकात्ता, मुंबई या महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या दरांची तुलना केल्यास पेट्रोलच्या दरांमध्ये मुंबईने उच्चांक गाठला आहे. यामध्ये मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 90.34, चेन्नईत 86.51, कोलकाता 85.19 तर दिल्लीत 83.71 रुपये पोहोचले आहेत.

डिझेलच्या दरातही मुंबईने उच्चांक गाठल्याचे दिसून येत आहे.  मुंबईत डिजेलचे दर प्रति लिटर 80.51 तर त्याखालोखाल चेन्नईत 79.21, कोलकात्ता 77.44 तर दिल्लीत 73.87 रुपये आहेत 

दहा दिवसात मुंबईत पेट्रोल, डिझेलची दरवाढ

मुंबईत गेल्या 10 दिवसाच्या पेट्रोल, डिजेलच्या दराची आकडेवारी लक्षात घेतल्यास पेट्रोल  लिटरमागे 82 पैसै तर डिजेल 85 पैशाने वाढल्याचे दिसून येतय. त्यामुऴे कोविडचा फटका बसलेल्या मुंबईकरांना पेट्रोल, डिजेलसाठी आपल्या खिशाला कात्री लावावी लागणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

petrol prices touched mark of ninety rupees mark diesel touched eight rupees per liter in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : मुलांकडून इंटरनेट वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करावेत: उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT