Mumbai Bhayander Fire Esakal
मुंबई

Mumbai Bhayander Fire : आझाद नगरमध्ये पसरले आगीचे लोट; एकाचा मृत्यू, तर ३ जण जखमी, पाहा घटनास्थळावरील मन हेलावणारे Photo

Mumbai Bhayander Fire : भाईंदर पूर्व येथून आगीची मोठी दुर्घटना समोर आली आहे. भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आग इतकी भीषण आहे, त्या आगीच्या धुराचे लोट अनेक किलोमीटरपर्यंत पसरले आहेत. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक झोपडपट्टीत आग लागली. अद्याप ही आग नियंत्रणात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. दीपक चौरसिया मृत व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला आहे. तर, आगीत होरपळून अनेकजण जखमी झाले आहेत. आगीतून बाहेर पडणारा काळा धूर परिसरात पसरला आहे.

या भीषण आगीत अनेक झोपडया व गोदामे जळून खाक झाली आहेत. आग लागलेली जागा सामाजिक वनीकरण व मैदानासाठी राखीव असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील सर्व बांधकामे अनधिकृत असल्याची माहिती आहे. महापालिका आयुक्त संजय काटकर व अन्य अधिकारी, पोलीस उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. भाईंदर पूर्व येथील गोल्ड नेस्ट सर्कलजवळील आझाद नगर झोपडपट्टीत ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. मात्र, परिसरात असलेल्या प्लास्टिकच्या सामानामुळे आग आणखीच पसरत आहे.

अग्निशमन दलाकडून सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळालेलं नाही. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानासह काही जण जखमी

महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. मुंबई, ठाणे आणि वसई महानगरपालिकेकडून अग्निशमन यंत्रे मागवण्यात आली आहेत, यावरून आगीची भीषणता लक्षात येत आहे.

24 अग्निशमक वाहने घटनास्थळी

एकूण 24 अग्निशमक वाहन आग विझवण्याचं काम करत आहेत. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT