pickup hit MSEDCL pole bent case has been registered against driver mumbai sakal
मुंबई

पिकअपची धडक बसली आणि महावितरणचा पोलच वाकला

कल्याण शीळ रोडवरील घटना; पिकअप चालकावर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - कल्याण शीळ रोडवरील सोनारपाडा भागात महावितरणच्या मेन लाईन च्या 2 व 12 नंबरचा पोलला एका पिकअपची जोरदार धडक बसली आणि लाईटचा पोलच वाकला. रस्त्याच्या दिशेलाच लाईटचा हा मेन पोल वाकल्याने काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतू महावितरण अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरु केले. यामुळे या भागातील वाहतूक संथ गतीने सुरु होती. शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास मालवाहू बोलेरो पिकअप ने या खांबाला धडक दिली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात पिकअप चाक दिनेश नागणे (वय 26) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे डोंबिवली व कल्याण पूर्व मधील काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. पर्यायी वीज वाहिनीवरुन या भागाचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात आल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास मालवाहू बोलेरो पिकअपने महावितरणच्या खांबाला धडक दिली आणि महावितरणचा पोल चक्क एका दिशेने झुकला. कल्याण शीळ रोडवर सोनारपाडा भागातील गॅलेक्सी समोरील महावितरणच्या मेन लाईनच्या 2 व 12 नंबरच्या पोलला या गाडीने ठोकले. या पोलवरुन डोंबिवली व कल्याण पूर्व या संपूर्ण भागास वीज पुरवठा होतो. पहाटेच लाईट गेल्याने अनेकांची झोप मोड झाली. अपघाताविषयी माहिती मिळताच महावितरण अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोल दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. अपघातामुळे डोंबिवली व कल्याण पूर्व परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता. परंतू तत्काळ पर्यायी लाईनवरुन या भागाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. काटेमानिवली भागाला मात्र या कामाचा फटका जास्त बसून या भागातील वीज पुरवठा सुरु होण्यास विलंब लागला.

याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता तुषार भागित (वय 32) यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात पिकअप चालक दिनेश नागणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना सकाळी 8 च्या सुमारास कार्यालयातील कर्मचारी योगेश साळवे यांचा फोन आला, त्यांनी कल्याण शीळ रोडवर घडलेल्या अपघाताची माहिती त्यांना दिली. दरम्यान तुषार यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता. तेथे मेन लाईन चा पोल हा रोडच्या बाजूने झुकलेल्या अवस्थेत दिसला. वाकलेल्या पोलजवळ एक मालवाहू बोलेरो पिकअप उभा होता. त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी वाहनावरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून पोलला धडक दिल्याचे सांगितले. महावितरण कंपनीचे 9 लाख 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून या चालकाविरोधात कंपनीतर्फे कायदेशीर तक्रार नोंदविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. दुपारी उशीरापर्यंत महावितरणच्या वतीने पोल दुरुस्तीचे काम सुरु होते. या कामामुळे कल्याण शीळ रोडवरील या भागातील वाहतूक संथ गतीने सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT