मुंबई

कबुतरांमुळे येतोय हार्ट ऍटॅक?

सकाळ वृत्तसेवा

ऐकायला जरा त्रासदायक वाटेल, पण हे अगदी खरंय. प्रेमाचं प्रतिक मानले जाणारे हेच कबुतर आता माणसाच्या जिवावर ऊठू लागलेत. कबुतरांमुळे तुम्हाला हार्ट ऍटॅक येऊ शकतो..श्वसनाच्या विकारांसह अनेक जिवघेणे आजार होऊ शकतात. मुंबईत राज्यातल्या अनेक शहरांमध्ये चौका चौकात कबुतरखाने आहे. लोकं इथं आवडीनं कबुतरांना दाणे टाकतात. पण याच कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतीय. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कबुतराची विष्ठा मानवी आरोग्यासाठी अतिशय हानीकारक आहे. विष्ठा सुकल्यानंतर त्यातील सुक्ष्म कण हवेत मिसळतात. त्यामुळे श्वसनमार्गाला सूज येऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. रूग्णाला हार्ट ऍटॅक येऊ शकतो. निमोनिया सारखा आजार होऊ रूग्ण दगावू शकतो 

कबुतरांच्या विष्ठेमुळे दिल्लीत एका महिलेला जीव गमवावा लागलाय. तर 300 पेक्षा जास्त रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. त्यामुळे तुम्ही कबुतरप्रेमी असाल तर सावध रहा. पक्षी आणि प्राण्यांवर प्रेम करणं गैर नाही. मात्र तुमचं अतिप्रेम जिवघेणंही ठरू शकतं. कबुतरखान्यातल्या कबुतरांची विष्ठा अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकते. 
 

WebTitle : pigeon are responsible for spreading heart and health issues 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

मालिकेतील वडिलांनीच खऱ्या आयुष्यात केलेलं मिताली मयेकरचं कन्यादान; म्हणाले, 'मला मुलं नाहीत पण...'

Solapur Jangam Samaj : जनगणनेत 'हिंदू' म्हणूनच नोंद करणार; जंगम समाजाचा निर्धार, शिवाचार्यांविरोधी वक्तव्याचा एकमुखाने निषेध

Paithan News: यंदाच्या नालेसफाईवर विशेष लक्ष द्यावे; पैठण पालिकेकडून अपेक्षा : वरवरच्या स्वच्छतेऐवजी गाळ काढण्याची गरज

Panchgani Pinewood School: पाचगणीतील पाईनवुड इंटरनॅशनल स्कूलची मान्यता धोक्यात; शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मान्यता रद्दीची शिफारस..

SCROLL FOR NEXT