मुंबई

मुंबईत पावसाळी आजारासाठी पालिकेकडून विशेष रुग्णालयासाठी नियोजन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- एकीकडे मुंबईकर कोरोनासारख्या व्हायरसचा सामना करत असताना आता दुसरं संकट येऊन ठेपलं आहे ते म्हणजे पावसाळा. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळा म्हटलं की त्यात पावसाळी आजारही उद्धभवत असतात. याच पार्श्वभूमीवर पावसाळी आजारांवरच्या उपचारांसाठी पालिका एक विशेष रुग्णालय उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. या विशेष रुग्णालयात 80 ते 100 खाटा उपलब्ध असतील. तर गजर पडल्यास ही क्षमता आणखी वाढवण्यात येईल. 

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मुंबईतील पावसाळ्यामध्ये वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालयं खचाखच भरली आहेत. कस्तुरबा रुग्णालयात साथीच्या रोग आजारांचे निदान आणि त्यावर उपचार केले जातात. मात्र सध्या या रुग्णालयात कोविड-19च्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून मलेरियाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरीही डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसचा त्रास मात्र वाढला आहे. पावसाळ्यात दुषित पाण्यातून होणाऱ्या आजारांमध्ये काविळीचं प्रमाणही जास्त असते. याच पार्श्वभूमीवर पालिका या विशेष रुग्णालयाचं नियोजन करत आहे. यात दूषित पाण्यातून निर्माण होणाऱ्या आजारांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी या रुग्णालयाचा प्रामुख्याने वापर करण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. येत्या आठवड्यात यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आजारांवर उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य केंद्रामध्येही वैद्यकीय उपचार मिळावे यादृष्टीने तयारी करण्यात येणार असल्याचं पालिकेनं सांगितलं. यामुळे मुख्य रुग्णालयांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. या केंद्रामध्ये मनुष्यबळ तसंच इतर वैद्यकीय उपलब्धताही वाढवण्यात येईल. 

वॉर्डनिहाय तयार केलेल्या वॉररुम्समुळे कोरोना असलेल्या आणि नसलेल्या रुग्णांनाही निश्चित मदत मिळेल. ज्यांना केवळ वैद्यकीय तपासणीची गरज आहे ते आरोग्य केंद्रामध्ये जातील तर ज्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे त्यांना उपनगरीय रुग्णालयांमध्ये ठेवण्यात येण्याच्या दृष्टीने खाटांची उपलब्धता तपासण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT