मुंबई

बापरे!  ब्लॅकने विकलं जातंय कोरोनातून बरं झालेल्या रुग्णाचं रक्त?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : जगात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे बहुतांश रुग्ण कोरोनातून उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. या रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या आणि त्यामुळे हे रुग्ण बरे झाले आहेत. मात्र आता अशा रुग्णांचं रक्त ऑनलाईन विक्रीला ठेवण्यात आलं आहे.

कोरोनाच्या उपचारानंतर रुग्णांच्या शरीरात असणाऱ्या रक्तात अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज शरीरात असणाऱ्या या कोरोना व्हायरसचा सामना करून त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होतो. रुग्णाला बरं वाटल्यानंतरही या अँटीबॉडीज भरपूर काळापर्यंत या व्यक्तीच्या रक्तात असतात. त्यामुळे अशा रुग्णाचं रक्त इतर रुग्णांसाठी फायद्याचं असतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मात्र आता डार्कनेटवर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाचं रक्त म्हणून रक्ताची विक्री केली जातेय. हे रक्त विकत घ्या आणि तुमच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमता वाढवा असं आवाहन करून याचा काळाबाजार केला जातोय. विशेष म्हणजे डार्कनेटवर हे रक्त प्रति लिटर १० लाखांच्या दरानं विकलं जातंय.

फक्त रक्तच नाही तर मास्क, ग्लोव्स, पीपीई सूट यासारख्या गोष्टीसुद्धा डार्कनेटवर दुप्पट किंवा तीनपट दरात विकल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार तब्बल १२ पेक्षा जास्त डार्कनेट मार्केट या गोष्टींचा काळाबाजार करत आहेत. विशेष म्हणजे  या कंपन्यांकडून कुठल्याही देशात शिपिंग करण्याचं आश्वासन दिलं जातंय. अमेरिका, युरोप, ब्रिटन इथे या काळाबाजार करणाऱ्या धंद्यांचं प्रमाण अधिक आहे.

डार्कनेटवर कोरोनाची असुरक्षित लस, गोळ्या, पीपीई सूट, मास्क आणि यशस्वी उपचार झालेल्या रुग्णाचं रक्त यांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. येणाऱ्या काळात हा अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक देशांच्या सरकारनं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं जाणकारांचं मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; सुप्रीम कोर्टाकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

Team India: सुट्टी नाहीच! फक्त विराट-रोहितच नाही, तर सर्वच भारतीय खेळाडूंना BCCI ची चपराक; ते सामने खेळा, तरच...

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

SCROLL FOR NEXT