Narendra Modi Sakal
मुंबई

Bohra Community : मी बोहरा कुटुंबातील सदस्य; वाचा PM मोदी नेमकं काय म्हणाले

बोहरा समाजाने दरवेळी स्वत:ला सिद्ध केल्याचे मोदी म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Inaugurated New Campus of Aljamea-tus-Saifiyah in Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. काहीवेळापूर्वी मोदींच्या हस्ते राज्यातील दोन वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानंतर मोदींच्या हस्ते अंधेरीतील मरोळमध्ये बोहरा मुस्लिम समुदायाचे अलजेमा-तूस-सैफी संकुलाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मद्रास बँडकडून मोदींचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, या उद्घाटनानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित करत मी बोहरा कुटुंबातील सदस्य असून, माझ्या ४ पिढ्या बोहरा मुल्सिम समाजासोबत गेल्या आहेत. या समाजाने दरवेळी स्वत:ला सिद्ध केल्याचे मोदी म्हणाले.

माझे भाग्य असे आहे की, मी चार पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. काळ आणि विकासाच्या बदलाच्या निकषांवर बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे.

आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले.

मी देशाताच नाही तर, परदेशातही गेल्यानंतर माझे बोहरा भाऊ-बहीण मला अवश्य भेटायला येतात.

यावेळी मोदी म्हणाले की, माझी एक तक्रार असून, तुम्ही त्यात सुधारणा करावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही मला वारंवार आदरणीय पंतप्रधान म्हणता. मी तुमच्या कुटुंबातील सदस्य असून, या ठिकाणी मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून आलेलो नाही तर, बोहरा समाजातील एक सदस्य म्हणून आल्याचे सांगत आफले या समाजाशी चार पिढ्यांपासूनचे संबंध असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup: महिला विश्वविजेत्यांचा ‘डायमंड’ सन्मान! हिरे आणि सौर उर्जेची दुहेरी भेट; उद्योगपती आणि खासदारांकडून खास गिफ्ट

DAYA DONGRE DIED: एका युगाचा अंत! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; प्रेक्षकांची खट्याळ सासू हरपली

Dhule News : गुलाबी थंडीची वाट, पण 'पर्जन्यराजा' थांबायला तयार नाही! धुळ्यात नोव्हेंबरमध्येही पावसाळी वातावरण, नागरिक हैराण

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Mumbai News: मुंबई सेंट्रल एसटी स्थानक राज्यात अव्वल; स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ उपक्रमात मानाचा तुरा

SCROLL FOR NEXT