PM Narendra Modi in Mumbai Sakal
मुंबई

PM Narendra Modi in Mumbai: मोदींच्या मुंबईतल्या सभेत घातपाताचा कट? शस्रासह एका व्यक्तीला अटक

दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या बीकेसी इथल्या मैदानात पंतप्रधान मोदींची सभा झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या वेळी बीकेसी मैदानावर त्यांची सभाही झाली. या सभास्थळावरुन आता एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीकडे शस्त्रेही आढळली आहेत.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए या मैदानामध्ये ही सभा झाली. याच परिसरातून मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीकडे घातक शस्त्रे आढळून आली आहे. गस्तीवरच्या पोलिसांना सभेच्या परिसरात हा व्यक्ती दिसला आणि त्यांच्यावर संशय आला.

त्यामुळे पोलिसांनी तपासणी केली. यावेळी या व्यक्तीकडे स्मिथ अँड व्हेजन स्प्रिंगफिल्डची रिव्हॉल्वर आणि त्याचे चार राऊंड सापडले. त्याच्यासोबत या रिव्हॉल्व्हरचा परवानाही सापडला आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतलं असून सभा ठिकाणाहून हलवलं आहे. त्याच्यावर मुंबई पोलीस आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी त्याच्यावर बीकेसी पोलिस ठाण्यात कलम 37(1), 135 मपोका 1951. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT