PM narendra modi visit mumbai Projects worth 38 thousand crores including Metro started in Mumbai  esakal
मुंबई

Mumbai News : मेट्रोसह ३८ हजार कोटींचे प्रकल्प मोदींच्या हस्ते मुंबईत सुरुवात

कॉमन मोबिलिटी कार्डाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (ता. १९) मुंबईत येत असून यावेळी ते दोन मेट्रोमार्ग सुरु करण्यासह ३८ हजार कोटी रुपयांच्या विकासप्रकल्पांची पायाभरणी करतील. मुंबईतील सर्व मेट्रो, लोकल आणि बस येथे चालू शकणाऱ्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल.

मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी पायाभरणी केलेल्या मुंबईतील दोन मेट्रोमार्ग, टू ए आणि सात यांचे लोकार्पणही ते करतील. हे दोन्ही प्रकल्प बारा हजार सहाशे कोटी रुपयांचे आहेत. दहिसर ते अंधेरी या पूर्व आणि पश्चिम मार्गांवर या दोन मेट्रो धावतील. यावेळी मुंबई वन मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यांचेही लोकार्पण मोदी करतील. या कार्डद्वारे मेट्रो, लोकल गाड्या, बस या प्रवासासाठी यूपीआय मार्फत डिजिटल पेमेंट करून तिकिटे खरेदी करता येतील.

सतरा हजार दोनशेकोटी रुपयांच्या सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते होईल. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी, वरळी येथे हे प्रकल्प उभारले जातील. त्यांची एकत्रित क्षमता चोवीसशे साठ एमएलडी आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना वीस ठिकाणी उघडला जात असून त्याचे उद्घाटनही मोदी करतील. येथे आरोग्यतपासणी, औषधोपचार, रोगनिदान व तपासणी या गोष्टी विनामूल्य होतील. ३६० खाटांचे भांडुप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, गोरेगावचे सिद्धार्थ नगर हॉस्पिटल (३०६ खाटा) व ओशिवरा मॅटर्निटी होम (१५२ खाटा) यांची पायाभरणीही मोदी करतील.

एमएमआरडीए मैदानावर मोदी यांची जाहीर सभा असून तेथूनच यापैकी बहुतेक प्रकल्पांचे उद्घाटन दूरस्थ यंत्रणेद्वारे होईल. मुंबईतील चारशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवातही मोदी करतील. हा प्रकल्प सहा हजार एकशे कोटी रुपयांचा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही मोदी करतील. हा प्रकल्प अठराशे कोटी रुपयांचा आहे. यामुळे येथील गर्दी तर कमी होईलच पण नव्या सोयीही निर्माण होतील, तसेच या पुरातन इमारतीलाही झळाळी मिळेल. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्जांचे वाटपही मोदी यांच्या हस्ते होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT