मुंबई

मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ: संजय राऊत

पूजा विचारे

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटिस बजावली. त्यानंतर त्यांना आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे देण्यात आले होते. मात्र चौकशीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला अधिकचा वेळ हवा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान पत्नीला आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला आहे. 

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नसल्याचा इशारा राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला आहे. तसंच ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मी अद्याप नोटीस पाहिलेली नाही. नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळं राजकारण कसं चालतं मला माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू दे आम्ही उत्तर देऊ, असंही त्यांनी सांगितलं. ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो, असंही बोलायला राऊत विसरले नाहीत. 

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं म्हणत देशात आजही कायदा असून त्याचा सन्मान केला पाहिजे. देशात सध्या इतर कोणतीही मोठी गोष्ट नाही. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान संजय राऊत यांनी एक ट्विटही केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ. 

वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Pmc bank scam case Wife varsha ed notice sanjay raut reaction tweet shayari

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : '7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार, नजर लागते म्हणून करायचा विशिष्ट विधी'; SIT तपासात धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये काँग्रेसची संघटन मजबुतीसाठी बैठक; जिल्हाध्यक्ष पदासाठी चार नेते इच्छुक

Viral Video : शिक्षण आहे की व्यवसाय? इयत्ता दुसरीच्या पुस्तकांसाठी मोजावे लागले ९,००० रुपये; पालकाने मांडली व्यथा, व्हिडिओ व्हायरल

Hi Dear असा एक मेसेज अन् तुमचं बँक अकाऊंट होईल रिकामं; मोबाईल हॅक, नवा सायबर फ्रॉड नेमका आहे तरी काय? पाहा

गुन्हा कबूल केलाय, तक्रारदाराची तक्रारच संशयास्पद; खरातच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT