fake call Centre Google
मुंबई

मालाडमधील तीन फेक कॉल सेंटरवर छापे, १० जणांना अटक

मुंबई पोलिसांनी मालाड येथील तीन फेक कॉल सेंटरवर छापेमारी केली आहे.

पूजा विचारे

मुंबईः मुंबई पोलिसांनी मालाड येथील तीन फेक कॉल सेंटरवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत १० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. गुरुवारी पोलिसांनी मुंबईतल्या तीन फेक कॉल सेंटरवर छापेमारी करत उद्धवस्त केली. या तीन कॉल सेंटरवर बुधवारी मालाड आणि बांगूर नगर पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने छापे टाकले.

यातील पहिला छापा मालाडमधील एस. व्ही रोडवरील लोटस बिझनेस पार्क येथे टाकण्यात आला. दुसरा छापा बांगूर नगर येथील पाम स्प्रिंग अपार्टमेंट तर तिसरा छापा हा त्याच बिल्डिंगमध्ये मारण्यात आला. या छापेमारीत पोलिसांनी ४५ कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क, १४ लॅपटॉप, २८ मोबाईल फोन, इंटरनेट राउटर्स आणि काही साहित्य जप्त केले आहे.

याच महिन्यात १७ तारखेलाही वाशी आणि सानपाडा भागात सुरु असलेल्या तीन फेक कॉल सेंटरवरही पोलिसांनी छापे मारले होते. त्या छापेमारीत पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती. बजाज फायनान्स कंपनीच्या नावानं ही टोळी फेक कॉल सेंटरवर चालवत होती. ही टोळी फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवायची आणि त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी, जीएसटी आणि इन्शुरन्सच्या नावाखाली रोख रक्कम उकळून त्यांची फसवणूक करत होती.

police busted three fake call centres in malad arrested 10 persons

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिचं बालपण हरवलं... सतत होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून मायरा वायकुळच्या पालकांनी घेतला मोठा निर्णय; नेटकरीही करतायत विचारपूस

Sangli ZP : पलूसमध्ये काँग्रेस-भाजप थेट रणसंग्राम; सत्ता टिकवायची की पराभव धुवायचा, प्रतिष्ठेची लढत

Friday Pradosh Vrat: शुक्रवारी प्रदोष व्रताचा दुर्मिळ योग, 'या' उपायांनी मिळेल शिव–लक्ष्मीची विशेष कृपा!

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली एचडी देवेगौडा यांची भेट

धक्कादायक! T20 World Cup साठी संघात निवड झालेल्या खेळाडू ICC कडून निलंबित; मॅच फिक्सिंगचे आरोप

SCROLL FOR NEXT