accused 
मुंबई

डार्क नेटच्या माध्यमातून तरुणांना विकत होते गांजा; पोलिसांनी प्रसिद्ध मिठाईवाल्याच्या मुलासह दोघांना केली अटक..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: एकीकडे कोरोनामुळे मुंबईत सर्वत्र शुकशुकाट आहे. कोरोनाच्या भीतीनं लोक आपल्या घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर दुसरीकडे मात्र मुंबईत गुन्ह्यांचं प्रमाण वाढतच चाललं आहे. त्यात डार्क नेटवर अनेक अवैध व्यवहार सुरू आहेत. असाच एक प्रकार मुंबईत घडलाय. इंटरनेटवर गांजाची विक्री जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

डार्क नेटच्या माध्यमातून गांजा मागवून महाविद्यालयीन तरूणांना त्याची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींमधील एक तरूण प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या मालकाचा मुलगा असल्याचे सूत्रानी सांगितले.

फैज शकील भिवंडीवाला(31) व आरिफ उस्मान मिठाईवाला(22) अशी अटक आरोपींची नावे आहेत. वांद्रे टर्नर रोड येथे गांजा घेण्यासाठी दोन व्यक्ती येणार असल्याची माहीति गुन्हे शाखेच्या कक्ष-9 चे सहाय्यक पोलिस निरीक सुधीर जाधव यांना मिळाली होती. 

त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टर्नर रोड येथे सापळा रचून दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्याच्या तपासणीत 224 ग्रॅम गांजा सापडला. आरोपीच्या चौकशीत 'टॉर' आणि 'विकर मी' या संकेतस्तळाच्या मदतीने डार्क नेटवरून हा गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले. 

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत साडे पाच लाख रुपये असून महाविद्यालयीन तरुणांना विक्री करायचे अशी माहिती पुढे आली आहे. आरोपींमधील आरीफ हा प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या मालकाचा मुलगा आहे.

police caught two drug dealers in mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT