money fraud sakal media
मुंबई

नवी मुंबई : चित्रपट निर्मात्याला ५० लाखांचा गंडा; अपहाराचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मराठी वाहिनीकडून मालिका निर्मितीचे काम मिळाल्याचे खोटे कागदपत्रे दाखवून एका फिल्म निर्मात्‍याकडून (Film producer) ५० लाख रुपये उकळणाऱ्या (fifty lac money fraud) संतोष एकनाथ राऊतविरोधात खारघर पोलिसांनी (kharghar Police) फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. खारघरमध्ये राहणारे अरविंद घेवडे (Arvind ghevade) मालिका व चित्रपटांचे निर्माते आहेत. ते मराठी, हिंदी मालिकांमध्ये भूमिकाही करतात. काही वर्षापूर्वी घेवडे यांची नीलेश शिवडे या कलाकाराच्या माध्यमातून संतोष एकनाथ राऊत याच्याशी ओळख झाली.

नीलेशने राऊतला एका मराठी वाहिनीकडून मालिका निर्मितीचे काम मिळाल्‍याचे व त्‍यासाठी पैशांची गरज असल्‍याचे सांगितले. घेवडेने त्‍याला पैसे देण्याची तयारी दर्शवून मार्च २०२१ मध्ये राऊतच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे ५० लाख पाठवले. मात्र त्‍यानंतरही मालिकेचे काम सुरू न झाल्‍याने विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली.

घेवडे यांनी पैसे परत मागितले असता टाळाटाळ करून मोबाईलही बंद केला. अखेर फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच घेवडे यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संतोष राऊत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT