crime  sakal media
मुंबई

मिरा-भाईंदर, वसई-विरारमधील तीन डॉक्टरांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या तीन डॉक्टरांवर (Police fir flied) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दोन्ही पालिका क्षेत्रातील एकंदर २४ दवाखान्यांवर दिवसभरात छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही शहरांतील काही डॉक्टर (doctor) अवैधरित्या व्यवसाय करुन नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेच्या पोलीसांना (crime branch police) मिळाल्या होत्या त्यानुसार पोलीसांनी मिरा भाईंदरमधील (Mira bhayandar) १० आणि वसई विरारमधील १४ अशा एकंदर २४ संशयित डॉक्टरांची यादी तयार केली होती.

त्यानंतर पोलीसांची स्वतंत्र पथके स्थापन करुन दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागाच्या सहाय्याने पोलीसांनी या २४ दवाखान्यांवर एकाच वेळी छापे घातले. यावेळी दवाखान्यात हजर असलेल्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी, महापालिकेकडील नोंदणी तसेच इतर प्रमाणपत्रांची पडताळणी केली.

चार दवाखाने बंद

या २४ दवाखान्यांपैकी चार दवाखान्यांशी संबंधित तीन डॉक्टरांवर अवैधरित्या व्यवसाय करत असल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आठ दवाखान्यांतील डॉक्टरांनी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद वाटत असल्यामुळे ताब्यात घेण्यात आली आहेत. या कागदपत्रांबाबतचा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडील पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

उर्वरित १२ डॉक्टरांपैकी आठ डॉक्टरांनी सादर केलेली कागदपत्रे योग्य असल्याचे आढळून आले, तर चार दवाखाने बंद असल्याचे दिसून आले. ही कारवाई गुन्हे शाखेच पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव पाटील आणि प्रमोद बडाख यांनी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

माहेरी एकुलती एक लेक पण सासरी खटल्याचं घर! अजूनही २ अविवाहित नणंदांसोबत संसार करतायत ऐश्वर्या नारकर

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

Shiv Sena Symbol Case : 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल'; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादावर संजय निरुपम यांचा मोठा दावा, शिंदेंच्या बंडाबाबतही केलं भाष्य

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT