police fir sakal media
मुंबई

नवी मुंबई : तलवारीने केक कापला; बर्थडे बॉयसह सहकाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : तलवारीने केक कापून वाढदिवस (Birthday celebration) साजरा करणे कामोठेतील तरुणाला व त्याच्या मित्रांना महागात पडले आहे. पोलिसांनी त्‍या तरुणासह त्याच्या ७ ते ८ मित्रांवर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल (Police fir filed) करून त्यांची धरपकड सुरू केली आहे. या तरुणांनी २२ जुलै २०२१ रोजी भररस्त्यात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला (cake cut by sword) होता. त्यानंतर त्यांनी सदरचा व्हिडीओ (video viral) चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

कामोठे सेक्टर-२० भागात राहणाऱ्या ओम कांबळे या तरुणाने २२ जुलै रोजी वाढदिवस भररस्त्यात साजरा केला होता. त्यावेळी ओम याने तलवारीने केक कापला होता. त्यावेळी काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्‍याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तलवारीने केक कापणाऱ्यांचा शोध घेतला असता, त्याचे मित्र अक्षय कांबळे, किशोर रणपिसे, सागर चंदणकर, कमलेश वरखडे व इतर असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT