Mumbai Crime Esakal
मुंबई

Mumbai Crime: कुर्ल्यात पुलाखाली आढळली बेवारस सुटकेस; उघडताच..., कुर्ल्यातील घटनेनं खळबळ

सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतून एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील कुर्ला येथे सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

या प्रकरणाच्या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितलं की, महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र तिचा मृतदेह पाहता तिचं वय 25 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिलेनं टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली आहे. तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सीएसटी रोड, शांती नगर येथे ही सुटकेस आढळून आली. मेट्रो रेल्वेचं बांधकाम सुरू असलेल्या बॅरिकेडच्या जवळ एका व्यक्तीला ही सुटकेस दिसली. त्याला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सुटकेसची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान ती सुटकेस सापडली. ही सुटकेस उघडली असता, त्यात मृतदेह आढळून आला.या महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा दिसलेल्या नाहीत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती, म्हणजे लैंगिक अत्याचाराची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. तसेच शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याचीही माहिती आहे.

या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सुटकेस सापडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यामध्ये पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. कुर्ला पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचाही तपासात सहभाग आहे.

मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी अधिकारी सर्व पोलिस ठाण्यातून बेपत्ता महिलांची माहिती गोळा करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT