police
police 
मुंबई

लाल शर्टच्या "सुता'वरून  काढला आरोपीचा माग! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे आपण अपहरण केल्याचा बनाव करत त्याच्या कुटुंबीयांकडून 40 लाखांची खंडणी मागण्याचा प्रयत्न एका टॅक्‍सीचालकाच्या अंगलट आला. गुन्हे शाखा कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. अमीर अली शहजाद अली शेख असे आरोपीचे नाव आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ लाल शर्टच्या "सुता'वरून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. 

कुर्ला पश्‍चिम येथील एका ज्वेलर्स मालकाचा 39 वर्षीय मतिमंद भाऊ 6 नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी ज्वेलर्स मालकाने जागोजागी पोस्टर लावले होते; तसेच समाजमाध्यमाचीही मदत घेतली होती. दरम्यान, अमीर अली याला ज्वेलर्स मालकाचा भाऊ बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे कळले. त्याने या संधीचा फायदा घेण्याचे ठरवत 16 नोव्हेंबरला ज्वेलर्स मालकाला इंटरनेटच्या आधारे (व्हीओपी) फोन केला. तुमचा बेपत्ता भाऊ आमच्या ताब्यात असल्याचे सांगून त्याच्या सुटकेसाठी 40 लाख रुपयांची मागणी केली. भावाचे अपहरण झाल्याचे कळताच ज्वेलर्स मालकाने कुर्ला पोलिस ठाण्यात अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध तक्रार दाखल केली. कुर्ला पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखा कक्ष 5 ने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अपहरणकर्त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. मात्र तो इंटरनेट कॉल करत असल्याने त्याचा मोबाईल क्रमांक व ठावठिकाणा सापडत नव्हता. अखेर कक्ष 5 चे प्रभारी जगदीश साईल, पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील, सुरेखा जुंजाळ, पोलिस उपनिरीक्षक महेश बंडगर, हिंदुराव चिंचोळकर, पोलिस अंमलदार विलास घागरे, नितीन जाधव, नितेश विचारे आणि रवींद्र राणे यांनी तपासाची दिशा बदलवली. 

दरम्यान, अपहरणकर्त्याने ज्वेलर्स मालकाला पुन्हा फोन करून "आपको लाल शर्ट अच्छा लग रहा है', असे म्हणत पुन्हा धमकावले. पोलिसांनी त्यानुसार ज्वेलर्स दुकानाजवळचे सीसी टीव्ही फुटेज तपासले असता एक इसम ज्वेलर्स दुकानाजवळ बराच वेळ घुटमळताना दिसला. योगायोगाने त्या संशयित अपहरणकर्त्यानेही लाल शर्ट परिधान केला होता. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांनी खबऱ्यामार्फत आरोपीचा माग काढून शनिवारी कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरील महाराष्ट्र काटा येथून ताब्यात घेतले. 

केवळ संधीचा फायदा 
पोलिसांनी संशयित अपहरणकर्त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, आपण कुणाचेही अपहरण केलेले नसून केवळ संधीचा फायदा घेऊन पैसे उकळण्यासाठी नाटक केल्याचे पोलिसांना सांगितले. अमीर अली याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून पुढील तपासासाठी त्याला कुर्ला पोलिसांकडे देण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT