मुंबई

बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेताना, पोलिसाकडून तरुणीशी संतापजनक वर्तन; त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

विजय गायकवाड

नालासोपारा : उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये तरुणीवर झालेले बलात्कार प्रकरण ताजे असताना राज्यातही एक संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. नालासोपाऱ्यात एका 19 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांकडून आणि परिसरातील मुलांकडून तिचा मानिक छळ केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने केला आहे. 

आत्महत्या केलेल्या तरुणीचे सुनील माने या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. सुनीलने लग्नाचे आमिष दाखवून या तरुणीशी शरिरसंबंध ठेवले होते. मात्र तो नंतर लग्नाला नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने 15 सप्टेंबर रोजी आपल्या आई सोबत तुलिंज पोलीस ठाण्यात जाऊन प्रियकर सुनील माने यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पण बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तापासाधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक गिरकर यांनी पीडित तरुणी सोबत असभ्य वर्तन करत महिला पोलिसांनी पीडितेचा जबाब न घेता एका पुरुष पोलिसांनी जवाब घेतला. तसेच तिला अपमानास्पद वागणूक दिली.

या सर्व प्रकाराला कंटाळून मुलीने शुक्रवारी रात्री 8 वाजता राहत्या घरात आत्महत्या केली असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या आई वडिलांनी केला आहे. मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाही जोपर्यंत होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, असा पवित्रा ही पीडितेच्या आईने घेतला आहे. 

लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने बलत्कार केल्या प्रकरणी पीडित तरुणीच्या जवाबा वरून तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुद्धा न्यायालयीन कोठडीत आहे. आम्ही आमची कारवाई केली आहे. पीडित तरुणीच्या आत्महत्येनंतर सुद्धा सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या सर्व घटनेचा तपास सुरू असून जे कोणी दोषी असतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. 
विजयकांत सागर,
अप्पर पोलीस अधीक्षक, वसई

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT