मुंबई

लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, महिलांशी संपर्क साधण्यास सुरूवात

अनिश पाटील

मुंबईः  लॉकडाऊनच्या काळात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. त्यानंतरही अनेक महिला पुढे येऊ शकल्या नाही, ही शक्यता लक्षात घेऊन आता उत्तर मुंबईतील पोलिसांनी स्वतः झोपडपट्टी आणि गावठाण परिसरात जाऊन त्यांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत उत्तर मुंबईतील 82 ठिकाणी अशा बैठका घेण्यात आल्या आहेत. आठवड्याभरात उत्तर मुंबईतील 152 झोपडपट्टी परिसरात अशा बैठका घेण्यात येणार आहे.

लैंगिक अत्याचाराच्या प्रसंगाला सामोरे गेल्यानंतरही लॉकडाऊनमुळे काही महिला त्याची तक्रार करू शकल्या नाहीत. ही शक्यता लक्षात घेऊन आता पोलिसांनी स्वतः झोपडपट्टी परिसरातील महिलांची बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. त्या अंतर्गत अल्पवयीन मुले आणि मुलींनाही गुड टच आणि बॅड टचचे धडे देण्यात आले. उत्तर मुंबईतील पोलिसांनी हा स्तुत्य उपक्रम या आठवड्यापासन सुरू केला आहे.

शाळा सुरू असताना मुंबई पोलिस पोलिस दीदी या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थांना मार्गदर्शन करायचे. पण सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यामुळे मुलांपर्यंत पोहोचण्याचा हा देखील एक मार्ग पोलिसांनी निवडला आहे. याशिवाय सध्या मुले घरातच असल्यामुळे परिचित व्यक्तींकडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन अशा बैठकांच्या मार्फत लोकजागृती करण्यास सुरूवात केली आहे.

उत्तर परिमंडळातील पोलिसांनी त्यांच्या परिसरातील 152 झोपडपट्टी आणि गावठाणापैकी 82 ठिकाणी आठवड्याभरात बैठका घेऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच लैंगिक अत्याचाराच्या करणाऱ्या व्यक्तीला न घाबरता पोलिसांना त्याची तक्रार करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

या उपक्रमा अंतर्गत स्थानिक प्रतिनिधी, नगरसेवक यांची मदत घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमां अंतर्गत अनेक महिलांनी त्यांच्या अडचणी पोलिसांना सांगितल्या आहेत. त्या अनुषंगाने गेल्या 10 वर्षातील सराईत लैंगिक अत्याचारातील आरोपींची यादी बनवण्यात आली आहे. त्यात 63 व्यक्तींचा समावेश असून येणाऱ्या काळात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Police initiative curb things start contacting women mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT