police officer shekhar bagade sakal
मुंबई

Dombivali Crime : पोलीस अधिकारी शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंग चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत भाजपने बागडे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. बागडे यांना सक्तीच्या रजेवर सध्या पाठविण्यात आले आहे. यानंतर आता भाजपने बागडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची सुमारे 50 ते 60 कोटीची बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे दाखल केली.

भाजपचे पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्ती नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. डोंबिवली प्रकरणावरुन मंत्री चव्हाण आक्रमक असल्याने राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांना समर्थन दिले. या आक्रमकपणातून भाजपने कल्याण, ठाणे, पालघर लोकसभेसाठी दावा करुन शिंदेच्या शिवसेनेला कैचीत पकडले आहे.

शेखर बागडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खास मर्जीतले ओळखले जातात. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि त्यानंतर आलेली भाजप शिंदे गटाची सत्ता असो मंत्री चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे यांच्यात विकास कामे, सार्वजनिक कार्यक्रम विषयांवरुन धुसफूस सुरू आहे.

मंत्री चव्हाण यांना डोंबिवलीत लक्ष करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे. याचा एक भाग म्हणून चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे समर्थक डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा बागडे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला.

जिल्हा शिवसेना नेत्याच्या इशाऱ्यावरुन बागडे यांनी ही कृती केल्यावरुन भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. बागडे यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने त्यांची, त्यांचे मंत्रालयातील बंधू मंगेश आणि कुटुंबीयांची सुमारे 50 ते 60 कोटीची बेहिशोबी मालमत्ता शोधून त्याची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा याठिकाणी लागू होत असल्याने ईडीकडेही बागडे यांची तक्रार केली जाणार आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT