मुंबई

तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलाय, कपडे आणि इतर साहित्य बांधून ठेवा, ऍम्ब्युलन्स तुम्हाला न्यायला येतेय

विष्णू सोनवणे

मुंबई - कोरोनाचा तुमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. कपडे आणि इतर साहित्य बांधून ठेवा, ऍम्ब्युलन्स तुम्हाला न्यायला येत आहे. फोनवरील हे संभाषण ऐकताच माझ्या पायाखालची वाळूचा सरकली. आता आपण काही जगत नाही, या भीतीने मी हादरून गेलो. मला काहीच सुचत नव्हते. कोणाशी काय बोलावे समजत नव्हते. त्या क्षणापासून मी मृत्यू जगत होतो. कोरोनाचा हा जीवघेणा थरार अनुभवला आहे मुंबईतील एका पोलिस उपनिरीक्षकाने.

डोंगरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश हरडक कोरोना बाधित झाल्यानंतरचा त्यांनी अनुभवलेला थरारक अनुभव ते सांगत होते. ते म्हणाले, मी गावी गेलो तेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली. आता मुंबईला जाऊ नका असे घरचे सर्वजण सांगत होते. मुंबईला जाण्यासाठी साधन नव्हते, अशा प्रसंगी ड्युटीवर हजर राहणे माझे कर्तव्य होते. घरच्यांचा विरोध डावलून मी मुंबईला यायला निघालो. दुसऱ्या दिवशी मी पोलिस ठाण्यात दाखल झालो.

12 एप्रिल रोजी माझे सहकारी अंमलदार यांना ताप येऊ लागला, त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची कोरोनाचा चाचणी करण्यात आली. त्यात त्यांना कोरोनाचा झाल्याचे आढळून आले. त्यांच्या संपर्कातील आमच्या सगळ्यांची चाचणी करण्यात आली त्यात माझा रिपोर्ट पोझिटीव्ह आला. रिपोर्ट कळल्याबरोबर काय करावे माझे मला कळेना झाले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगताच आपण बॅग भरा तुम्हाला एमबुलन्स न्यायला येत असल्याचे सांगितले, काही मिनिटात दारात एमबुलन्स आली त्यात बसलो आणि ती गाडी थेट फोर्ट इथल्या ईएनटी रुगणालयात पोचली.

मला काहीच कळत नव्हते. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी वेगळा मार्ग होता. मनावर प्रचंड दडपण होते. रुगणालयात शिरताच मला रडू येत होते. माझा धीर सुटत चालला होता.मला एके ठिकाणी विलगिकरण कक्षात ठेवले. त्या ठिकाणी 28 पेशंट होते, कोणी खोकत होतं, रडत होतं, कोणी व्हेंटिलेटरवर होते. मी आता येथून जिवंत जात नाही, मी नक्कीच मारणार असे मला वाटत होते. काही वेळाने मला अधिकाऱयांचे फोन येऊ लागले. माझ्या सहकार्याचे फोन येऊ लागले, त्यामुळे मला थोडा धीर आला, या काळात मी गावी माझ्या घरच्यांना काहीच सांगितले नव्हते. गावी याबाबत सांगितले असते तर मला जास्त त्रास झाला असता. त्यामुळे मी गावी सांगणे टाळले, आजूबाजूची परिस्थिती नकारात्मक होती, मात्र मी सकारात्मक विचार करीत होतो.

28 एप्रिल रोजी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता मात्र तोही हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला साजरा करता आला नाही. मनावर प्रचंड दडपण होते. पोलीस आयुक्त यांच्यासह, माझें वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यानी दिलासा दिल्यामुळे दडपण थोडे हलके झाले. योग्य आहार, फळे, पिण्यासाठी गरम पाणी आणि सकारात्मक विचार यामुळे मी बरा झालो. सात दिवसात माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 

कोरोनाचा झाल्यास खचून जावू नये, आहार घ्यावा, विश्रांती घ्यावी, आपल्या जवळच्या लोकांशी बोलावे, त्यातून आत्मविश्वास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, कोरोनाचा बाधित असाल तर तुम्ही लवकर बरे व्हाल असा मला विश्वास वाटतो.

police officer tells his corona story and shares his experience of institutional quarantine 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Semifinal: ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! शफली वर्माचे पुनरागमन, पण कांगारूंच्या ताफ्यात शतक करणारी कर्णधारही परतली; पाहा Playing XI

Manusmriti Controversy : मनुस्मृती पुन्हा चर्चेत; कामगार धोरणाच्या मसुद्याने पेटला वाद, काँग्रेसचा मोदी सरकारसह RSS वर हल्लाबोल

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय; भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात, आजपासूनच नियम लागू

Viral Video : 52 व्या वर्षी महिमा चौधरीने दुसऱ्यांदा केलं लग्न ? व्हिडीओ झाला व्हायरल, जाणून घ्या सत्य

Bombay High Court: फक्त शिवीगाळ म्हणजे गुन्हा नाही : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT