रेल्वे प्रवासात चोरीस गेलेला करोडोंचा मुद्देमाल 101 फिर्यादिना रेल्वे पोलिसांकडून वितरण.jpg 
मुंबई

पोलिसांमुळे तक्रारदारांची मकर संक्रांत गोड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या हार्बर, मध्य आणि पश्‍चिम रेल्वे प्रवासात गेल्या ३०, ३५ वर्षांत चोरीस गेलेला करोडोंचा मुद्देमाल आज मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. मकर संक्रातीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल १०१ फिर्यादींना आपला मुद्देमाल परत मिळाला. त्यामुळे पोलिसांनी आमची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड केल्याची भावना फिर्यादींनी व्यक्त केली.

रेल्वेचे मुंबई पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते मुद्देमाल देण्यात आला. मुंबई रेल्वेतून रोज किमान ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेक नागरिकांचे मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम किंवा पर्स चोरी होतात. १९८६ पासून २०१९ पर्यंत रेल्वे प्रवासात चोरीस गेलेला मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी तपास करत

आरोपींकडून जप्त केला होता. मंगळवारी (ता. १४) तो फिर्यादींना परत देण्यात आला.
घाटकोपर पूर्वमधील पंतनगर रेल्वे पोलिस कवायत मैदानात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत एक कोटी पाच लाख रुपये एवढी होती. यात दोन किलो २८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदी ९१ ग्रॅम, पाच लॅपटॉप, एक लाखाची रोख रक्कम, दीड लाख किमतीचा कॅमेरा आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT