Police giving water to monkey sakal media
मुंबई

वाह पोलिसदादा! माकडाला पाणी पाजतानाचा व्हिडिओ पाहून अख्खं सोशल जग भारावलं

पोलिस हवालदार संजय गुढे यांचे होतेय कौतुक

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मार्च महिन्यापासून उन्हाचा पारा हा 40 अंशाच्या (Summer hit) पार गेला असून माणसांना याचा त्रास होत आहे. वाढत्या उन्हाचा त्रास लोकांना होत असताना मुक्या प्राण्यांनाही त्यांची झळ पोहोचत आहे. असेच एक माकड पाण्याच्या शोधात (water need) माळशेज घाटात फिरत असताना पोलिस हवालदार संजय गुढे (Police sanjay gudhe) यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ गाडी थांबवून जवळील बॉटल मधील पाणी या माकडाला पाजले. माकडाला पाणी पाजतानाचा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल (video viral on social media) होत असून त्यांचे कौतुक प्राणीप्रेमींकडून केले जात आहे.

सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी एका माकडाला आपल्या पाण्याच्या बाटलीमधून पाणी पाजून त्याची तहान शमवताना दिसत आहे. या व्हिडीओची माहिती काढली असता मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील हा व्हिडीओ असल्याचे समजले. महामार्ग पोलिस दलातील माळशेज घाट येथे पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असलेले संजय हे काही दिवसांपूर्वी घाटातून जात असताना रोडच्या बाजूला एक माकड पाण्याच्या शोधात त्यांना दिसले.

भर दुपारची वेळ व कडक ऊन असल्याने त्यांनी लागलीच त्यांची गाडी बाजूला घेत स्वतःजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतील पाणी त्या माकडाला दिले. उन्हामुळे तहान लागत असून पाण्याअभावी माणसांचा जीव कासाविस होतो. मुक्या प्राण्यांचीही तळमळ होत असून त्यांना पाण्याच्या शोधात लांब लांब फिरावे लागते. सदर माकड हे पाण्याअभावी कासाविस झाले होते म्हणून मी त्याला पाणी पाजल्याचे संजय यांनी सांगितले. संजय यांनी पशू प्राण्यांविषयी दाखविलेल्या या माणूसकीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT