मुंबई

व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसमुळे पत्नीला वाचवता आले पतीचे प्राण

मुंबई पोलिसांचं सर्वत्र कौतुक

दीनानाथ परब

मुंबई: समयसूचकता आणि वेळीच झटपट पावलं उचलून मुंबई पोलिसांनी आत्महत्या करायला निघालेल्या एका व्यक्तीचे (Police Saves Man) प्राण वाचवले. व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसवरुन या व्यक्तीने आत्महत्येचा विचार व्यक्त केला होता. पतीचं हे स्टेटस (whatsapp status) पाहिल्यानंतर पत्नी लगेच सर्तक झाली. तिने लगेच पोलिसांना याची माहिती दिली व पतीला शोधण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली. (Police Saves Mumbai Man Who Shared His Parting Words On WhatsApp)

पोलिसांनी सुद्धा झटपट पावलं उचलत त्या व्यक्तीला शोधून काढलं. पोलिसांना घाटकोपर रेल्वे स्थानकावर हा व्यक्ती सापडला. पोलिसांनी त्याला सुखरुप घरी सोडले. 'समुपदेशनानंतर त्या व्यक्तीला सुखरुप त्याच्या कुटुंबाकडे सोडलं' असं मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन या घटनेची माहिती दिली व 'स्टेटस अपडेट: सेफ' असे टायटल दिले आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबासोबत काढलेला फोटोही पोस्ट केला आहे. फक्त त्याची ओळख जाहीर केलेली नाही. पोलिसांनी झटपट उचललेल्या पावलांच सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी कमेंटमधुन पोलिसांच कौतुक केलं आहे.

"लाखो लोकांना आयुष्यात अशा कठिण प्रसंगातून जावं लागतं. त्या व्यक्तीला आनंद आणि शांतता मिळो. देव त्या व्यक्तीला या कठिण परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर काढो, अशी मी प्रार्थना करतो" असं अदिल मिस्त्री या युझरने म्हटलं आहे. इतरांनी पोलीस अधिकाऱ्यांच कौतुक केलेय पण पोलिसांनी मास्क घातलं नसल्याचही निदर्शनास आणून दिलय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT