मुंबई

दिवाळीनंतर मुंबई पोलिसांतील ५५ वर्षांवरील पोलिस बांधवाना पुन्हा कर्तव्यावर बोलावलं जाण्याची पडताळणी सुरु

सुमित बागुल

मुंबई : मुंबई ठाण्यासारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग पाहायला मिळाला. अशात पोलिसांवरील ताण देखील मोठा होता. असं असतानाही पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम चोख केलं जातंय. दरम्यान कोरोना काळात मुंबई पोलिंसाच्या ५५ वर्षांच्या वरील पोलिसांना कामावर गैरहजर राहण्यास अनुमती देण्यात आली होती. मात्र आता दिवाळीनंतर ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू व्हावं लागणार अशी चिन्ह आहेत. मुंबई पोलिसांकडून त्याप्रकारचे चाचपणी सुरु आहेत. 

राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यांनतर मुंबई ठाण्याची परिस्थिती भीषण झालेली पाहायला मिळाली. अशा भीषण कोरोनाच्या परिस्थितीत मुंदेखील मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं. कोरोनाकाळात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली, अनेकांचे कोरोनामुळे जीवही गेले. कोरोनाच्या ऐन संवेदनशील काळात पोलिस यंत्रणा नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात आहोरात्र काम करत होती.   

दरम्यान, आता मुंबई आणि राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करतोय. अशात अनेक कंपन्या, अनेक कार्यालये देखील सुरु झालेली पाहायला मिळतायत. मुंबईतील जवळपास सर्व व्यवहार सुरु झालेत. या पार्श्वभूमीवर आता ५५ वर्षांवरील पोलिसांना पुन्हा कर्तव्यावर बोलवलं जाणार अशी पडताळणी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार ५५ वर्षांच्या वरील पोलिस बांधवाना हलक्या स्वरूपाचे काम दिले जाऊ शकते. या पोलिस बांधवांवर  कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याचीही काळजी घेतली जाणार आहे. सोबतच १२ तास कर्तव्य आणि ४८ तास सुटी देण्याचा विचार देखील केला जातोय. 

police workers above 55 years will might have to join duty after diwali

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Latest Marathi News Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT