Shivaji Park Sakal
मुंबई

Assembly Elections 2024 : शिवाजी पार्कचे ‘मैदान’ कोण मारणार ?

Vidhan Sabha Elections 2024 : एकाच दिवशी जाहीर सभेसाठी चार पक्षांमध्ये चढाओढ...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यांच्या सभेसाठी मोठ्या मैदानांचे आरक्षण सुरू झाले आहे. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा घेण्यासाठी चार राजकीय पक्षांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत.

यामुळे हे ‘मैदान’ कोण मारणार याकडे लक्ष लागले. सध्या पालिका प्रशासनाने हा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये मुंबईतील ३६ जागांवर निवडणूक होत आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मध्ये तिकीट वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोणत्याही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. असे असले तरी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभांसाठी मोक्याची मोठी मैदाने मिळावीत, अशी स्थानिक नेत्यांची इच्छा आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांकडून मैदानांच्या आरक्षणासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर निवडणूक जाहीर सभेसाठी चार राजकीय पक्षांनी पालिकेकडे अर्ज केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अर्ज देण्यात आल्याची माहिती महापालिका उत्तर विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. त्यांच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

पालिकेच्या निर्णयाकडे लक्ष

शिवसेनेत बंड झाल्यानंतर दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या सभांमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेने मैदान मारून नेले होते. यावेळीही त्यांनी अर्ज केला आहे. सध्या हे अर्ज पालिकेच्या दफ्तरी दाखल आहेत. लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे. हे मैदान आपल्यालाच मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT