Sameer Wankhede 
मुंबई

ड्रग्ज प्रकरणात राजकारण्यांचा हात?; समीर वानखेडे म्हणतात...

याप्रकरणी अनेक व्हॉट्सअॅप चॅट्स एनसीबीच्या हाती

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई-गोवा क्रूझवर सुरु असलेली रेव्ह पार्टीवर मोठ्या कारवाईनंतर नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांनी तपासाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणी अनेक व्हॉट्सअॅप चॅट मिळाले आहेत त्यावरुन काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

या प्रकरणात राजकीय सहभागाची चर्चा असल्याबद्दल वानखेडे यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला. पण या केवळ अफवा आहेत त्यामुळे तुम्ही असे प्रश्न मला विचारु नका, असंही ते माध्यम प्रतिनिधींना म्हणाले.

दरम्यान, या बड्या कारवाईबाबत सांगताना समीर वानखेडे म्हणाले, "याप्रकरणी एनसीबीला खबऱ्यांकडून खबर मिळाली होती. या धाडीमध्ये विविध प्रकारचे ड्रग्ज आम्ही जप्त केले आहेत. अजूनही याचा तपास सुरु असून यामधील तपासातून आणखी काही माहिती हाती येईल. आज तीन जणांना आम्ही कोर्टात सादर केलं. त्यांना एक दिवसाची कोठडी कोर्टाने दिली याशिवाय इतर पाच जणांनाही आम्ही अटक केली आहे. त्यांनाही उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant VS Narayan Rane : उदय सामंतांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर नारायण राणेंचा इशारा; कोकणात वाढली राजकीय खळबळ

Fatty Liver: तुमचं लिव्हर फॅटी आहे की नाही, घरबसल्या ओळखा; डॉक्टर सरीन यांनी सांगितल्या ट्रिक्स

Latest Marathi News Live Update : पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Corruption Case : हॉस्पिटल ते स्मशानभूमी, सगळीकडे मागितली लाच; मुलीच्या मृत्यूनंतर निवृत्त अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा धक्कादायक अनुभव

IND vs AUS 2nd T20I Live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा काय बदल झाला! अर्शदीपला मिळाली का संधी?

SCROLL FOR NEXT