मुंबई

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय काय मिळालं? देवेंद्र फडणवीसांनी वाचला पाढा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात फार काही मिळाले नसल्याचे टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती निधी आणि कोणत्या कामासाठी दिला याबाबत सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून अर्थसंकल्पावरील टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिले.

केंद्रीय अर्थसंकल्प न वाचता, राज्याला अर्थसंकल्पात काहीच मिळाले नाही. महाराष्ट्र अर्थसंकल्पात कुठेच दिसतच नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी अर्थसंकल्पाच्या संदर्भात सांगण्यात आल्या. त्यामुळे मी स्वतः या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं याचा अभ्यास केला. त्यातून जी माहिती समोर आली आहे. ती आपल्या समोर ठेवत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

राज्याला कोणत्या कामांसाठी किती निधी मिळाला

  • 3 लाख 5 हजार 611 कोटी इतका एकूण निधी 
  • 328 रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांसाठी, 1 लाख 33 हजार कोटी रुपये,
    त्यात मुंबई, पुणे, रेल्वेच्या 16 नवीन लाईन्स ( 2हजार किमी ), 5 गेज कनवर्जन प्रोजेक्ट, 18 दुहेरीकरणाचे प्रकल्प,  
  • हवामान आधारीत शेतीविषक प्रकल्पांसाठी 672 कोटी रुपये.
    महाराष्ट्र एॅग्री बिझिनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशन  - 232 कोटी
  • दमनगंगा प्रकल्पासाठी  - 3 हजार 8 कोटी रुपये
  • अमृत योजनेसाठी - 1 हजार 31 कोटी 
  • विदर्भ, मराठवाडा व इतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांसाठी 1200 कोटी रुपये
  • शेतकरी सन्मान निधी साठी - 6 हजार 823 रुपये
  • अन्न सुरक्षा योजना - 153 कोटी रुपये
  • मुंबई मेट्रो 3 - 1832 कोटी रुपये
  • पुणे मेट्रो - 3 हजार 195 कोटी
  • नागपूर मेट्रो टप्पा 2  - 5 हजार 200 कोटी
  • नाशिक मेट्रो प्रकल्प - 2 हजार कोटी
  • मुंबईतील इतर प्रकल्पांसाठी - 441 कोटी
  • मुंबई -  अहमदाबाद हायस्पीड ट्रेन - 7 हजार 800 कोटी
  • परिवहन संदर्भातील निधी
    लोकमान्य टिळक टर्मिनसवर कोच सुविधा विस्तार, पनवेल कळंबोली टर्मिनस, CSMT रेल्वे स्थानक फलाट विस्तार, हडपसर सॅटेलाईट टर्मिनल विस्तार, अजनी सॅटेलाईट टर्मिनल विस्तार, पुणे रेल्वे फलाट विस्तार, दिल्ली मुंबई रेल्वे मार्ग हायस्पिड करण्यासाठी मार्गाचे सबलीकरण, 
  • मुंबईतील एमयुटीपी टप्पा 2 - 200 कोटी रुपये
  • मुंबईतील एमयुटीपी टप्पा 3 - 150 कोटी रुपये
  • मुंबई उपनगरीय लोकल सेवा - 650 कोटी रुपये
  • प्रवासी सुविधा निर्माणाकरीता -  636 कोटी रुपये
  • राज्याला कर परताव्याचे - 42 हजार कोटी रुपये
  • फायनान्स कमिशन ग्रॅंट - 10 हजार 961 कोटी रुपये

'राज्याला केंद्राकडून पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी अर्थसंकल्पात मंजूर कऱण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही. महाराष्ट्र अर्थसंकल्पात कुठे दिसत नाही. हे सपशेल खोटे आहे. अपेक्षा एवढीच आहे. राज्य सरकारने मेट्रो 3 सारखे इतर प्रकल्प थांबवू नये. ते पुर्ण करण्यासाठी निधी खर्च करण्यावर भर द्यावा', असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.

------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

politics marathi Maharashtra gets huge funds from the budget 2021 devendra Fadnavis criticism political latest updates

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT