गोरगरिबांसाठी नगरसेविका बनल्या भाजी विक्रेत्या! 
मुंबई

गोरगरिबांसाठी नगरसेविका बनल्या भाजी विक्रेत्या!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासत आहे. अशा काळात नागरिकांना चढ्या भावात भाजीपाला घेण्याची वेळ येऊ नये, म्हणून स्वत: नगरसेविकाच भाजीविक्रेत्या बनल्या आहेत.

कोरोनाला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुरबाड शहर लॉकडाऊन मध्ये असल्याने काही व्यापाऱ्यांनी चड्या भावात भाजीपाला व दुध विकण्यास सुरुवात केली होती. यांचा फटका सर्वसाधारण ग्रामस्थांना बसू लागल्याने अनेक तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीच्या नगरसेविका साक्षी चौधरी यांनी आपल्या पतीच्या मदतीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर भाजीपाला व दुध विक्री सुरु केली आहे. ग्राहकांसाठी कांदे 18 रूपये किलो, टोमॅटो 7 रूपये किलो, वांगी 10 रूपये किलो, दुध 50 रूपये लिटर आणि द्राक्षे 100 रूपयात 3 किलो अशा माफक दरात विक्री सुरू केल्याने मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकप्रतिनीधी असल्याने जनतेसाठी संकटात धावून जाणे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी स्वत: भाजीपाला माफक दरात विक्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला माझे पती संतोष चौधरी यांनी पाठबळ दिल्याने हे शक्य झाले.
साक्षी चौधरी, नगरसेविका, मुरबाड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Reshuffle : कोणत्या मंत्र्यांचे पद जाणार, कोणाला मिळणार संधी? मोदींनी अचानक बोलावली बैठक! मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार?

Lonavala Police Bribery Case : लोणावळ्यात खळबळ! आधी घेतले 1 लाख 30 हजार, पुन्हा 20 हजारांची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षक रंगेहात जाळ्यात, मँगो गार्डन परिसरात सापळा रचून अटक

ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचे व्हॉटसअप हॅक, स्टेटसला २० आक्षेपार्ह व्हिडीओ; पोलीस दलात खळबळ

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच

Rare Black Panther Rescue : चिपळूणमध्ये थरारक बचावकार्य! 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ 'ब्लॅक पँथर'ला वनविभागाने दिले जीवनदान, पिंजरा सोडताच बिबट्या...

SCROLL FOR NEXT