Mumbai Bank Election Team eSakal
मुंबई

मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबै बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार थोड्याच वेळापुर्वी सह्याद्री अतिथिगृहात अर्थ मंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबै बँकेतील प्रतिनिधीची एकत्र बैठक पार पडली. या बैठकीसा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबै बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परीवर्तण करण्याची रणनीती आखल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आता मुंबै बँकेवर अध्यक्ष पदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्ष पदी अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर केलीय. तसेच शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांना महत्वाची जबाबदारी मिळणार असल्याचीही माहीती मिळतेय. थोड्याच वेळात मुंबै बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची गुप्त मतदानाने निवडणूक होत आहे. यावेळी कोण कुणाच्या पारड्यात मतदान करतंय आणि कोण निवडून येतंय हे समजेल.

असं आहे पक्षीय बलाबल

  • शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेस = ११ संचालक

  • भाजप = ९ संचालक

असं मुंबै बँकेचं सत्ता समीकरण असल्यामुळे विद्यमान अध्यक्ष आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदावरून आता पायउतार व्हावे लागणार हे स्पष्ट झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT