चौथ्या लॉकडाऊनमध्ये  राज्यांना "हे" अधिकार मिळण्याची शक्‍यता
चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यांना "हे" अधिकार मिळण्याची शक्‍यता  
मुंबई

चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारांना "हे" अधिकार मिळणार?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर देशात सुरू असलेला तिसरा लॉकडाऊन उद्या (रविवारी) संपत असून चौथ्या लॉकडाऊनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर वगळता अन्यत्र शिथिलता आणण्याचे राज्य सरकाचे प्रयत्न असतील, असे संकेत मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे राज्यातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असूनही तिथे उद्योगधंद्यांना परवानगी देताना झोनच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्याने केंद्राकडे ही मागणी केल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे सूतोवाच दिले आहेत; मात्र याचे स्वरूप कसे असेल याविषयी कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. या लॉकडाऊनमधील नियम आणि अटी उद्या, रविवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहेत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे स्वरूप जाहीर करण्याअगोदर प्रत्येक राज्याने काही मागण्या केल्या आहेत. यात झोन निश्‍चित करण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावे ही प्रमुख मागणी आहे. आता झोन निश्‍चित करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे 17 मे रोजी संपत असताना चौथ्या लॉकडाऊनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात झोन निश्‍चितीचे स्वातंत्र्य राज्यांना मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

वाहतुकीवर निर्बंध! 
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. यातही मुंबई, पुण्यात परिस्थिती बिकट होत चालली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे 31 मेपर्यंत कडक लॉकडाऊन ठेवण्याची इच्छा आहे. सोबतच आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचाही सरकारचा प्रयत्न असेल. राज्य सरकारला, मुंबई एमएमआर, पुणे आणि पुणे प्राधिकरण, सोलापूर आणि मालेगाव, औरंगाबाद वगळता अन्य ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटते. त्यामुळे राज्य सरकार ही ठिकाणे वगळता अन्य जिल्ह्यांत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची शक्‍यता आहे. 

झोन निश्‍चित करण्याचे स्वातंत्र्य द्या
राज्यातील "ऑरेंज' आणि "ग्रीन' झोनचे निकष बदलले आहेत. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही, तर असा जिल्हा ऑरेंज झोन; तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती; तर ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत, तो जिल्हा रेड झोन असेल. हे सर्व झोन केंद्राने तयार केलेल्या निकषावर आधारित आहेत. त्यामुळे आम्हाला झोन निश्‍चित करण्याचे स्वातंत्र्य देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT