मुंबई

मुंबईतील कोव्हिड बेड कमी होण्याची शक्‍यता; रुग्णसंख्या घटल्याने खासगी रुग्णालयांचा विचार

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने खासगी रुग्णालये दिवाळीनंतर कोव्हिड खाटा कमी करण्याचा विचार करत आहेत. राज्य सरकारने अनेक निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनारुग्णांच्या तुलनेत इतर आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णांअभावी रिक्त पडून असलेल्या बेड्‌सचा वापर करण्याची रुग्णालयांची योजना असल्याचे बॉम्बे रुग्णालयाचे सल्लागार चिकित्सक आणि खासगी रुग्णालयांतील कोव्हिड बेड्‌सचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले. 

पालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीनुसार, कोरोनारुग्णांसाठी विविध खासगी रुग्णालयात एकूण 4,192 बेड राखीव ठेवण्यात आले असून त्यातील 2,204 बेड रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 1,007 आयसीयूपैकी तब्बल 422 बेडही रिक्त आहेत. कोरोना रुग्णांसाठी ठेवण्यात आलेल्या एकूण सुविधेच्या जवळपास 42 टक्के सुविधा वापराविना पडून आहेत. त्यामुळे रुग्णालयांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने या रिक्त बेड्‌सचा वापर इतर रुग्णांसाठी करण्याचा विचार खासगी रुग्णालये आता करत आहेत. 
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नाही आली, तर कोरोना बेडची संख्या कमी करू आणि दिवाळीनंतर कोव्हिड नसलेल्या रुग्णांसाठी त्यांचा वापर करू, असे खासगी रुग्णालयातील काही डॉक्‍टरांनी सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोनारुग्णांसाठी राखीव असलेले बेड कमी करण्याचा निर्णय दिवाळीनंतर लगेच घेऊ नये. कारण दिवाळीनंतर रुग्ण कमी होतील की वाढतील, याचा अंदाज अजूनही नाही, असा इशारा ज्येष्ठ डॉक्‍टरांनी दिला आहे. 


...तर सरकारने पैसे द्यावेत! 
मुंबईत दुसरी लाट आल्यास नियम परत लागू करता येतील. सरकारला किमान बेड राखून ठेवावे, असे वाटत असेल, तर खासगी रुग्णालयांना मूळ खर्चाची रक्कम द्यावी. रिक्त बेड राखून ठेवण्याऐवजी ते पुन्हा वापरात आणणे चांगला निर्णय आहे. कारण बेड्‌स व उपकरणांची देखभाल करण्यासाठी रुग्णालयांना त्यांच्या खिशातून पैसे द्यावे लागत आहे, असे आयएमए, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. 
--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT