मुंबई

पालिका रुग्णालयात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅबच्या तुटवड्याची शक्यता

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना बाधित रुग्णांवर रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे, बाजारात या इंजेक्शनची मागणी वाढत असून पालिकेकडे ही हा साठा कमी होत आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत पालिका रुग्णालयात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झाली नसल्याने सध्या रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब इंजेक्शनची मागणी वाढली आहे. पालिका रुग्णालयातही या इंजेक्शनचा साठा कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, पालिका रुग्णालयात या इंजेक्शनचा साठा कमी होत असला तरी वेळीच ऑर्डर देऊन उपलब्ध करण्यात येतात. सध्या लक्षणे नसलेली रुग्ण आढळत असल्याने सगळ्यांनाच ही इंजेक्शन देणे गरजेचे नाही. सध्या टोसीलीझुमॅबची मागणी कमी झाली असून रेमडेसिवीर इंजेक्शनला मागणी आहे. त्यामुळे गरजेनुसार साठा मागवण्यात येईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

एखाद्या कोरोना रुग्णांची मध्यम अथवा गंभीर प्रकृती असल्यास अशा रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यास त्याचे प्राण वाचवणे शक्य आहे. पालिकेच्या नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात या इंजेक्शनचा वापर केला जात असून कोरोनामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णासाठी हे इंजेक्शन उपयोगी ठरत आहे. पालिकेने 33 हजार इंजेक्शन खरेदी केली होती. त्यापैकी 2,800 इंजेक्शनचा साठा पालिकेकडे उपलब्ध आहे. मागणीनुसार पुरवठा वाढवत असून जादा इंजेक्शनची खरेदी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

टोसीलीझुमॅब इंजेक्शन

मागणी - 2,495 
वापर - 2,355 
शिल्लक - 140

रेमडेसिवीर इंजेक्शन

मागणी - 33,727 
वापर - 30, 927
शिल्लक - 2,800

--------------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Possibility shortage of remedesivir and tocilizumab Mumbai BMC Hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT