Rohit Arya allegedly locked several children inside a room and issued threats to set it on fire.

 

esakal

मुंबई

Powai Children Kidnap: खळबळजनक! पवईत एका व्यक्तीनं २० मुलांना खोलीत ठेवलं डांबून अन्... असा झाला किडनॅपिंगचा थरार

mentally disturbed man locked children in a room at Powai : जाणून घ्या, त्या व्यक्तीबाबत काय धक्कादायक माहिती समोर आली आहे?

Mayur Ratnaparkhe

Shocking Incident in Powai: Children Locked Inside Room : मुंबईमधील पवई भागात एका व्यक्तीने साधारण १५ वर्षाखालील २० मुलांना एका खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने मुलांना पेटवून देण्याचीही धमकी दिली होती.

तर प्राप्त माहितीनुसार मुलांना डांबून ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव रोहित आर्य असल्याचे समोर आले असून, तो एक मानसिक रूग्ण आहे. तर या व्यक्तीने या मुलांनी पवईमधील RA स्टुडिओत डांबून ठेवलं होतं.

ऑडिशनच्य नावाखाली या व्यक्तीने या लहान मुलांना बोलावलं होतं, परंतु मुलं जेवणासाठी बाहेर न आल्याने हा प्रखार उघडकीस आला. यानंतर जेव्हा गोंधळ माजला तेव्हा पोलिस आणि अग्निशमक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर या रोहित आर्य या व्यक्तीला पोलिसांनी आधी ताब्यात घेतलं आणि नंतर अटक केली. दिलासादायक बाब म्हणजे या व्यक्तीच्या ताब्यातील सर्व मुलं सुखरूप आहेत आणि मुलांची आता सुटका करण्यात आलेली आहे.

धक्कादायक बाब म्हणजेय या मानसिक रूग्ण असलेल्या व्यक्तीने स्टुडिओत रॉकेल ओतून ठेवलं होतं आणि मुलांना पेटवून देण्याची धमकी दिली होती. यानंतर मुलांना घाबरून खिडकीमधून हात दाखवत मदतीसाठी आरडाओरड केली. सहा दिवसांपासून हा व्यक्ती मुलांना शुटींगासाठी बोलवत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad: रोहित शर्माच्या सोबतीला सलामीसाठी दोन पर्याय! IPL 2026 Auction नंतर मुंबईचा संघ; तगडी Playing XI

IPL 2026 Auction : १९ वर्षीय आयुष, कार्तिक, २०चा प्रशांत वीर, २२ वर्षांचा ब्रेव्हिस; पण ४५ वर्षांचा MS Dhoni 'धुरंधर'; Memes व्हायरल

Achievers Of 2025: 'या' भारतीय कलाकारांनी बदलली मनोरंजनाची व्याख्या; त्यांच्या पॉवर परफॉर्मर्सवर एक नजर

Yavatmal News : बोगस मतदारांनंतर जन्म मृत्यूचीही बोगस नोंद? गावची लोकसंख्या दीड हजार, पण नोंदी २७ हजारापेक्षा जास्त; मुंबई कनेक्शन समोर...

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत लढविणार पन्नास जागा

SCROLL FOR NEXT