मुंबई

Powercut! वीज पुरवठा खंडित; मुंबई आणि उपनगरातील सिग्नल यंत्रणेवरही परिणाम

अनिश पाटील

मुंबई : मुंबईमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका वाहतुक व्यवस्थेलाही बसला. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद झाली होती. अखेर वाहतुक पोलिसांनी काही काळ स्वतः वाहतुक नियंत्रीत केली.

मुंबईतील विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे शहरात सर्वत्र दोनतास वीज पुरवठा बंद होता.महापारेषणच्या 400 केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट 1ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाण्यामधील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला फटका बसला होता. घरगुती ग्राहकासोबत शहराती अनेक कार्यालयांनाही याचा फटका बसला. वाहतुक यंत्रणाही याला अपवाद नव्हती. त्यामुळे शहरातील वाहतुक प्रभावीत झाली होती.

वांद्र येथील लकी जंक्शन परिसर हा मुंबईतील एका व्यस्त जंक्शन पैकी आहे. सोमवारी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे येथील सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळ वाहतुक पोलिस स्वतः रस्त्यावर उतरून वाहतुक नियंत्रीत करत होते. पण सुरूवातीच्या काही काळ सर्वच चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होत. काही काळ वाहतुक कोंडीची परिस्थितीही निर्माण झाली होती. पण वाहतुक पोलिसांनी योग्य ते नियोजन करून सर्व वाहतुक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT