मुंबई

VIDEO! मुंबईतील पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी फायर ब्रिगेडनं केला असा सराव

सकाळ वृत्तसेवा



मुंबई- एकीकडे कोरोना व्हायरसचं संकट असताना आता दुसरीकडे पावसाळा तोंडावर आला आहे. काही दिवसातच मुंबईत पावसाला सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन पावसात उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी तयारी करत आहे. मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडतात. तसंच काही ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण होते. अशातच लोकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफची टीम आणि मुंबई फायर ब्रिगेड बचावकार्यासाठी धाव घेतात. याच पार्श्वभूमीवर ही परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई फायर ब्रिगेडनं रविवारपासून सराव सुरु केला आहे. 

गिरगाव चौपटीवर हा सराव करण्यात आला आहे. या सरावादरम्यान काही फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहे. जवानांनी बोट चालवण्याचा सराव केला. तसंच खोलवर समुद्रात जाऊन पूरजन्य परिस्थितीत नागरिकांची सुटका करायची याचंही प्रशिक्षण घेतलं. या सरावादरम्यान समुद्राचे पाणी हे खूप स्वच्छ दिसत होते. 

केवळ 40 टक्केच नालेसफाई बाकी
महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी कामाची आखणी केली आहे. त्यातूनच पूर्व उपनगरातल्या नालेसफाईचं काम आतापर्यंत 60 टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश ही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले.  

यंदा मुंबई तुंबणार? 
गेल्या आठवड्यात मुंबईत यंदा तब्बल 291 ठिकाणी पाणी तुंबू शकते, असा अंदाज महापालिकेनं व्यक्त केला होता. हा अंदाज व्यक्त करत पालिकेनं त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या या ठिकाणांसह अन्य जागी पाणी उपसा करणारे सुमारे 350 हून अधिक पंप सज्ज ठेवण्यात येणारेत.  

पंपांसाठी पालिका 70 कोटी खर्च करणार 
यंदा 291 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असल्यानं तुंबलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी 300 हून अधिक पंप सज्ज ठेवणार आहेत. तर पालिका यंदा पंपांसाठी 70 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. गेल्यावर्षी मुंबईत 225 ठिकाणी पाणी तुंबलं होतं. तेव्हा 298 पंप बसवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT