मुंबई

Prakash Ambedkar: "दिवाळी साजरी करण्यासाठी गरिबांना 1 हजार रुपये द्या"; आंबेडकरांची PM मोदींना विनंती

राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी देशभरात जोरदार सुरु आहे. त्यासाठी निमंत्रण देण्याची लगबग सुरु आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देशवासियांना २२ जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

पण यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी मोदींनी १-१ हजार रुपये गरीबांना वाटप करावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे. (Distibute one thousand rupees each to BPL Family then only Diwali can be celebrated on 22 January Prakash Ambedkar advice to PM Modi)

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं की तुम्हाला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं का? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं, "मी वर्तमानपत्रातून वाचतोय की मला निमंत्रण येणार आहे, त्याची मी वाट पाहतोय" (Latest Marathi News)

दुसरं असं की, मोदींनी २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. यापूर्वी मोदींनी टाळ्या वाजवण्याचं, थाळ्या वाजवण्याचं केलेलं आवाहन आम्ही मान्य केलं आहे. आता दिवाळी साजरी करण्याचं आम्ही मान्य करतो. फक्त मोदींना आमची एवढीचं विनंती आहे की, जी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबं आहेत त्यांना मोदींनी १-१ हजार रुपये द्यावेत, जेणेकरुन ते दिवाळी साजरी करु शकतील. (Marathi Tajya Batmya)

हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबं आहेत त्यांना जर त्यांच्याच पैशांनी दिवाळी साजरी करायची असेल किंवा त्यांनी दिवाळी साजरी केलीच तर त्यांना आपल्या मुलांना गोडधोड खाऊ घालण्यासाठी दोन-तीन ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील. म्हणून पंतप्रधानांची इच्छा असेल की २२ तारखेला देशभरात दिवाळी साजरी झाली पाहिजे तर त्यांनी १ हजार रुपये द्यावेत, असं प्रकाश आंबडकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT